Beed news
न्यायदंडाधिकारी यांनी एखाद्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यास जाब विचारल्याच्या घटना अनेक वाचायला मिळतात. पण एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तालुका दंडाधिकारी म्हणजेच प्रथमवर्ग न्यायधीश यांना पत्र पाठवून जाब विचारल्याचे पत्र सोशल मिडिया वर व्हायरल झाले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांचे हे पत्र दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी लिहलेले आहे. त्या पत्रावर पोलीस ठाण्याचा शिक्का आणि मिरकर यांची सही पण आहे. मात्र या पत्राला जावक क्रमांक नाही.
या पत्रानुसार मिरकर यांनी आपणास शिक्षा व्हावी या हेतूने न्यायधीश वडवणी यांनी गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवला. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपली चौकशी सुरु केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच न्याय दंडाधिकारी यांनी खोटे आणि द्वेषबुद्धीने जाणीवपूर्वक आरोप केलेले आहेत.
न्यायदंडाधिकारी द्वेषबुद्धीने जाणीवपूर्वक आरोप
न्यायदंडाधिकारी तथा न्यायधीश स्वतः लोकसेवक असतानाही नुकसान पोहचविण्याच्या हेतूने आपण भादवि कलम १६६ १६७ १७७ १८२ ब व १८९ चे उल्लंघन केले असल्याचे दिसून येत असल्याने आपणाविरुद्ध गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये अशी विनंतीही मिरकर यांनी या पत्रात केली आहे. या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक बीड यांना पाठविण्यात आली असल्याचे त्यात म्हटले आहे.
आणखी वाचा :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार
Nice site