१४४ रुग्णांना डिस्चार्ज तर १२० बाधित ची रुग्णसंख्येत भर

 

अहमदनगर दि 22 डिसेंबर प्रतिनिधी

जिल्ह्यात आज १४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११३२ इतकी झाली आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३ आणि अँटीजेन चाचणीत ७७ रुग्ण बाधीत आढळले.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता ०३, राहुरी ०२, संगमनेर ०४, श्रीरामपूर ०१, इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:भाजपचे माजी खासदार तथा नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल

अँटीजेन चाचणीत आज ७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १३, कर्जत ०४, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०२, पाथर्डी १४, राहाता ०९, संगमनेर १५, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २३, अकोले ०५, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, पाथर्डी २३, राहाता ०८, राहुरी ०३, संगमनेर २०, शेवगाव ०२, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६५६५५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ११३२*

*मृत्यू:१०२४*

*एकूण रूग्ण संख्या:६७८११*

हेही वाचा: 8 पिस्तूल बाळगणाऱ्या 3 व्यक्तीस अटक;सांगवी पोलिसांची कारवाई

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles