अहमदनगर दि 22 डिसेंबर, प्रतिनिधी
अहमदनगर येथील नगर अर्बन बँकेत ३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह तत्कालीन शाखाधिकारी,संचालक यांच्यासह कर्जदारावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी यांनी दिली आहे.
याबाबत बँकेच्या प्रशासकांनी नियुक्त केलेले प्राधिकारी, अर्बन बँकेचे शाखा अधिकारी मारूती औटी यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून या सर्व जणांविरोधात भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७१ व १२०ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत.
शाखा अधिकारी मारूती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ७ ऑक्टोबर २०१७ ते दि. १०नोव्हेंबर २०१७ या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी (रा. देवेंद्र बंगला, आनंदऋषी मार्ग, अहमदनगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बँक कॉलनी, शिलाविहार समोर, गणेश मंदीराशेजारी, सावेडी, अहमदनगर), कर्जदार मे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे (रा. शिवानंद, वेदांतनगर, सावेडी, अहमदनगर) आणि संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचुन, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे. सदर ३ कोटी रूपयांची रक्कम या आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे.गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेच्या ३ कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी,अफरातर व फसवणुक केली आहे. असे या फिर्यादीत
म्हटले आहे.
हेही वाचा: बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
You got a very excellent website, Glad I detected it through google. https://hcvmedi.com buy Hepatitis C Virus medical online