चोरी करणारे आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

- Advertisement -
- Advertisement -

बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

अहमदनगर दि 22 डिसेंबर ,प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्याची कामगिरी अहमदनगर च्या स्थानिक गुन्हे शाखेने केली असून त्यामुळे अनेक घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.या आरोपींची अनेक तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.

फिर्यादी जयशिंग लालासाहेब शेटे, वय- ४० वर्षे, धंदा- शेती, रा. डीकसळ, ता- कर्जत हे त्यांचे राहते घर बंद करुन कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एकूण
४८,५००/-रु. किं. चा ऐवज चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा दाखल झाल्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकूमार देशमूख यांना
गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा पल्या भोसले, रा. बेलगांव, ता- कर्जत याने व त्याचे साथीदारांनी मिळून
केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/बबन मखरे, पोना/सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, पोकॉ/प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, मेघराज कोल्हे, चालक पोना/मेघराज कुसळकर अशांनी मिळून बेलगाव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी नामे १) पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले, वय- २२ वर्षे, रा. बेलगांव, ता- कर्जत यांस पाठलाग करुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यास
विश्वसात घेवून सदर गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा भाऊ भगवान भोसले व
साथीदार प्रितम चव्हाण अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे पथकातील अधिकारी व
कर्मचारी यांनी आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) भगवान ईश्वर भोसले, वय-२० वर्षे, रा. बेलगाव, ता- कर्जत, ३)
प्रितम गुडुया चव्हाण, वय- २५ वर्षे, रा. मिरजगांव, ता- कर्जत यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना
विश्वासात घेवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरलेल्या रकमेपैकी ३५,०००/-रु.रोख रक्कम काढून दिल्याने सदरची रक्कम जप्त करण्यात आली असून चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता
सदरचे दागिणे हे आरोपी पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले याने त्याचे आई मिनाबाई ईश्वर भोसले (फरार) हिचे कडे दिले
असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. आरोपींना मुद्देमालासह कर्जत
पो.स्टे. ला हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही कर्जत पो. स्टे. हे करीत आहेत. वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी अनेक तालुक्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.१) आष्टी पो.स्टे. बीड २) नगर तालूका पो.स्टे.३) जामखेड पो.स्टे. 4) नगर तालूका पो.स्टे. ५) सांगोला पो.स्टे. बीड ६) पाथर्डी पो.स्टे. ७) कर्जत पो.स्टे. ८) पाथर्डी पो. स्टे. गुरनं.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा:गोवारी प्रश्नावर आपण दिलेला राजीनामा समाज हितासाठी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles