bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर
bio disel,अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर वाटेफळ वाटेफळ शिवारात हॉटेल हॉटेल स्वप्निलच्या मागे मोकळ्या जागेत विनापरवाना बायोडिझेल विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण विनापरवाना बेकायदेशीर रीत्या बायोडिझेल bio disel,विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी या बातमीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी या ठिकाणी छापा टाकून बेकायदा बेकायदेशीररीत्या बायोडिझेल bio disel,ची विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

bio disel 2

यामध्ये याठिकाणी तीन टॅंकर व दोन ट्रक उभे होते यासंदर्भात चौकशी केली असता येथील आरोपी अविनाश पोपटराव नाटक, बंडू बाळासाहेब जगदाळे, विजय अशोक वाडेकर, योगेश भगवान गंगेकर, चंद्रकांत शेखर सोनवणे, मुजमिल राजू पठाण, सचिन दशरथ लामखेडे ,अरुण माधयन, बाबासाहेब सखाराम बोरकर, हे या ठिकाणी आढळून आले.

bio disel,अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेलचा विनापरवाना विक्री करणारी टोळी कार्यरत

दोन ट्रक आणि तीन टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींकडून सहा मोबाइल असा मिळून एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांनी या आरोपींकडे चौकशी केली असता संजय अशोक साबळे यांच्या सांगण्यावरून आपण ही विक्री करत असल्याचे पोलिसांना सांगितले.

bio disel 3

मात्र संजय साबळे हा सध्या जेलमध्ये असून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक सोपान रमेश गोरे स्थानिक गुन्हे शाखा यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली असून या सर्व आरोपींच्या विरोधात जीवनावश्यक कायदा कलम 6 आणि विस्फोटक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले.

आणखी वाचा :Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles