sardar vallabhbhai patel,सरदार पटेल यांची जयंती 2021

- Advertisement -
- Advertisement -

 

 

 

sardar vallabhbhai patel,सरदार पटेल यांची जयंती आज देशात उत्साहात साजरी होत आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. यानिमित्ताने गुजरात येथील केवडिया येथे पोलीस दलातर्फे संचालन होत आहे.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) त्यांच्यावरील एक चरित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून 31 ऑक्टोबर रोजी हा माहितीपट चित्रपट विभागाच्या संकेतस्थळ  आणि यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.

READ MORE:crop insurance,खरीप 2020 व 2021 मधील पीकविमा शेतकऱ्यांना मिळणार-ना.मुंडेंनी व्यक्त केला विश्वास

एक दूरदर्शी स्वातंत्र्यसेनानी-नेते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन  (राष्ट्रीय एकता दिवस)  साजरा केला जातो.

sardar vallabhbhai patel,सरदार पटेल यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

लोहपुरुष : सरदार पटेल (20 मि / इंग्रजी / 2001 / विनायक जाधव) या चित्रपटात  सरदार पटेल यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्यात आला असून सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून बार्डोली सत्याग्रहातील त्यांची प्रमुख भूमिका यात अधोरेखित करण्यात आली आहे  जी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा  एक प्रमुख भाग म्हणून ओळखली जाते.  भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून   संस्थानांच्या  विलीनीकरणात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवरही यात भर देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles