हिंगोली- प्रतिनिधी
टास्क फोर्सच्या स्पष्ट सूचना नंतरच शाळा सुरू होतील असे स्पष्ट मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.हिंगोली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोना संक्रमण काही अंशी कमी झाल्यामुळे जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत आम्ही सूतोवाच केले होते .
परंतु त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेने वर्तवल्यानंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला होता.
आता गणपती उत्सवानंतर अनेक नागरिक एकत्रित आले आहेत. पंधरा दिवसाच्या काळामध्ये या एकत्रित येण्याचा आणि कोरोनाच्या संक्रमणाचा अंदाज घेतला जाईल.
Read More :सर्वोच्च नायायालायाचे मत; शाळा कधी सुरु करायच्या हा राज्य सरकारचा अधिकार
वर्षा गायकवाड यांची स्पष्ट भूमिका
त्यानंतर टास्क फोर्सशी चर्चा करून त्यांच्या स्पष्ट सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होणार आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे.
आज संसदरत्न राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी त्या हिंगोली दौ-यावर आल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना शाळा सुरु करण्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे .