- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
दिल्ली /गौरव डेंगळे
जपान येथे २१ वी आशियाई वरिष्ठ पुरुष व्हॉलीबॉल volleyball चॅम्पियनशिप दि १२ ते १९ सप्टेंबर २०२१ १६ संघामध्ये रंगणार आहे.
भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात असून या गटामध्ये ६ सुवर्णपदक विजेता यजमान जपान,कतार व बहरैन हे संघ आहेत.
भारतीय संघाचा पहिला सामना बहरैन संघाबरोबर दिनांक १२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी आज भारतीय संघ दिल्लीहून रवाना झाला.
कार्तिक अशोक भारतीय संघाचा कर्णधार असेल, तर जी ई श्रीधरन हे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम बघतील. भारतीय संघ आशिया व्हॉलीबॉल volleyball स्पर्धेत १७ वेळेस सहभागी झाला असून २००५ साली संघाने सर्वोत्तम प्रदर्शन करत स्पर्धेत ४ क्रमांक पटकावला होता.
आणखी वाचा : पोळा pongal विशेष ; बैलांचा देव आहे तरी कुठे?
निवड झालेल्या भारतीय संघाला आशियाई व्हॉलीबॉल volleyball कॉनफेडरेशनचे विभागीय सचिव श्री रामावतार सिंग जाखड,व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ अच्युता सामंता, महासचिव श्री अनिल चौधरी,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे आश्रयदाते श्री अविनाश आदिक, अध्यक्ष श्री पार्थ दोषी, सर्व पदाधिकारी भारतीय व्हॉलिबॉल volleyball महासंघ व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना आदींनी शुभेच्छा दिल्या.
खेळाडू/अधिकारी भारतीय वरिष्ठ पुरुष व्हॉलीबॉल volleyball संघाचे प्रतिनिधित्व करतील
टी कार्तिक अशोक (कर्णधार),आश्विन राय,प्रिन्स,चंद्र न अजिथलाल,शॉन थंगलथिल जॉन,चिराग,अश्विन राज महेश, जेरोम विनिथ, विनीत कुमार,शुभम चौधरी,मुथुसामी अप्पव,सकलेन तारिक,विकास (लिबेरो),खाटीक कमलेश (लिबरो),
संघाबरोबरचे अधिकारी
श्री अनिल चौधरी(संघ व्यवस्थापक),जी.ई. श्रीधरन(मुख्य प्रशिक्षक),
श्री नरेश कुमार(सहाय्यक प्रशिक्षक),श्री अविनीश कुमार यादव (सहाय्यक प्रशिक्षक),डॉ. दिग्विजय सिंह राठोर (फिजिओथेरपिस्ट),श्री रोमियो सिंह ठोकचॉम (रेफरी)
- Advertisement -