बीड जिल्ह्यात निर्बंध कधी उठणार ? नागरिकांचा सवाल,

- Advertisement -
- Advertisement -

 

बीड-प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यात निर्बंध कधी उठणार ? असा प्रश्न आता बीड जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत. किती दिवस हे निर्बंध असणार आहेत? यातून कधी मुक्ती मिळेल असे आता येथील जनतेला वाटू लागले आहे.

राज्यातील कोरोना वाढ होत असलेल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्याचा समावेश आहे. याचबरोबर राज्यातील अहमदनगर,सोलापूर यांचा समावेश होता. मात्र १५ ऑगस्ट पासून जवळच्या अहमदनगर जिल्ह्यात दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. त्यामुळे आता नगर पाठोपाठ बीडचे टाळेबंदी उठविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे.आज तिथे ११५५ कोरोना बाधित आढळून आले त्याप्रमाणात बीड जिल्ह्यात ११९ बाधित आढळून आले आहेत. हि संख्या नगण्य आहे. आजही नगर जिल्ह्यातील कोरोनाच्या नावाखाली आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांना प्रशासनाच्या वतीने  निर्बंध लादण्याचे काम केले जात आहे.

बीड जिल्ह्यात निर्बंध कधी उठणार ? बीड जिल्ह्यातील दुकाने, उपहारगृहे आणि इतर आस्थापनावरील निर्बंध उठविण्याची मागणी व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि नागरिकांकडून होत आहे.

नगर जिल्ह्यात दुकाने आता 10 वाजेपर्यंत चालू राहणार 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles