सह्याद्री चा पश्चिम घाट म्हणजे भारताचा जैवविविधतेने नटलेला निसर्ग

- Advertisement -
- Advertisement -

 

अकोले

शांताराम काळे

सह्याद्री चा पश्चिम घाट म्हणजे भारताचा जैवविविधतेने नटलेला जागतिक वारसाच यातील अनेक दुर्मिळ आणि प्रदेश निष्ठ वनस्पती म्हणजे भारताचे अमुल्य वैभवच आणि याच वैभवात आणखीन मोलाची भर पडली आहे.  गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच पी टीआर्ट्स , व आर. वाय. के. सायन्स कॉलेजचे सहायक प्रा . डॉ . कुमार विनोद गोसावी व त्यंच्या सहकार्यांनी विकोआ गोखलेई (vicoa gokhalei)

 

पश्चिम घाट

विकोआ गोखलेई

या नव्या फुल वनस्पतीच्या संशोधनाने सहयाद्री हरिश्चंद्र गडाच्या पर्वतरांगे मध्ये “पिंदाश्रीरंगी  , चांदोरे व विको गोखलेज या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लावला आहे या वनस्पती कोशंबीर कुळातील असून या वनस्पतीचा गण “पिंदा “हा उत्तर सह्याद्री डोंगर रांगेत सापडतो या अगोदर फक्त पिंदा कोक्नेसीस हि एकच प्रजाती ची नोंद आहे स्वीडन येथून१७ जुलै२०२० रोजी  प्रकाशित झालेल्या  नॉर्डिक जनरल ऑफ बॉटनी या जागतिक दर्जाच्या नियत कालिकेच्या माध्यमातून नोंद झाली आहे . विकोआ गोखलेई  हि फुलवनस्पती सुर्यफुल कुळातील असून मराठीमध्ये “सोनसरी “म्हटले जाते .पश्चिम घाटात घाटमाथ्यावर , डोंगराळ उतारावर वाढते १.४ फुट उंच , हिरवी पाने आणि गर्द पिवळ्या रंगाची फुले दुरूनच आकर्षित करतत दरवर्षी ऑक्टोबर जानेवारी पर्यंत याची फुले बहरतात सोन्सारीच्या जगामध्ये १४ प्रजाती आढळतात हरीस्चन्द्र्गड आणि रतनवाडी भागात संशोधक डॉ . विक्रम भोसले यांना हि वनस्पती नजरेस पडली . फुल , पाने ,रंग , बिया  यांचा आकार अशा विविध भागाचा सखोल अभ्यास अंती “विकोआ गोखलेई” तिच्या इतर प्रजाती पेक्षा भिन्न ठरते याचीच दखल घेत हि नाविन्यपूर्ण वनस्पती १७ नोव्हेंबर २०२० रोजी न्यूझीलंड येथून प्रकाशित होणार्या फायटोटेक्नाया जागतिक दर्जाच्या निय्त्कालीकेतून प्रसिद्ध  झाली आहे .तर हरिश्चंद्र गड व परिसरातील वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी फेरफटका मारत असताना डॉ गोसावी आणि सहकारयांनी या वनस्पती शोधल्या या संशोधनात गोखले एज्युकेशन व आर वाय के महाविधालय नाशिकचे डॉ . व्ही एन  सूर्यवंशी , आबासाहेब मराठे प्राचार्य डॉ . पी जी पवार डॉ . बी आर कांगुणे डॉ . एन एल जाधव , प्रा . एस जी मेंगाळ आदींचे सहकार्य लाभले . पिंदा श्रीरंगीचे वैशिष्ट्ये —उभ्या कातळावर वाढते , १ते १. मिटर उंची पाने ५०ते ९० सेंमी लांब  फुले पांढऱ्या रंगाची लहान फुलोऱ्यातील कडेच्या फुलांच्या पाकळ्या मोठ्या फुलोरे आकर्षक पंच्या देठावर आणि खोडावर गडद रंगाच्या रेषा .* नामकरण —राजापूर तालुक्यासह सह्याद्री च्या पर्वत रांगा मध्ये झालेल्या संशोधना मध्ये प्रा . डॉ . श्रीरंग रामचंद्र यादव यांचे योगदान राहिले असल्याने त्याच्या नावावरून “पिंदा श्रीरंगी “असे नाव या फुलं वनस्पतीला देण्यात आले तर १०० वर्षाचे   प्रदीर्घ कार्य लक्षात घेऊन  गोखले एज्युकेशनच्या नावावरून ” विकोआ गोखलेई “या फुल वनस्पतीला नाव देण्यात आले आहे .

पश्चिम घाट

 

पिंदा

पश्चिम घाट

 

डॉ . कुमार विनोद गोसावी

माझे संशोधन 2007 पासून म्हणजे मी जेव्हा पासून संशोधक विद्यार्थी म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक श्रीरंग रामचंद्र यादव यांच्या कडे रुजू झालो तेव्हा पासून. यादव सर ह्यांचे संशोधनातील कार्य फार मोठे आहे त्यामुळे त्यांची ओळख जागतिक पातळीवर आहे. त्यांनी सपुष्प वनस्पती वर्गीकरण आणि संवर्धन ह्याविषयात काम केले आहे. म्हणून विज्ञानात माहीत नसणारी पिंदा ह्या गणातील वनस्पती मला व माझ्या सहकाऱ्यांना पहिल्यांदा हरिश्चंद्रगड येथून मिळाली. यादव सरांचे बहुमूल्य कामावरून ह्या प्रजातीला यादव सरांचे नाव दिले (पींदा shrieangii). तसेच सूर्यफूल कुळातील दुसरी वनस्पती चे नाव गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नावाने दिले. वर उल्लेख केलेल्या दोन्ही वनस्पती वैज्ञानिदृष्ट्या हरिश्चंद्रगड येथून पहिल्यांदा. शोधल्या आणि त्यांना शास्त्रीय नाव दिले. पिंदा shrieangii ही सध्या फक्त हरिश्चंद्रगडावरील नमूद करण्यात आलेली आहे. तर Vicoa gokhalei सह्याद्रीच्या उंच तुरळक भागात आढळते. ह्या दोन्ही वनस्पती दुर्मिळ असून त्यांचे संवर्धन गरजेचे आहे. गेली तीन वर्षापासून आम्ही हे संशोधन करत आहोत .

हेही वाचा:शेतकऱ्याने केली गांज्याची शेती;पोलिसांनी केली गांज्याची झाडे जप्त

 

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles