तरच अशा गावात 8 ते 12 चे वर्ग सुरू होणार

- Advertisement -
- Advertisement -

…तरच अशा गावात 8 ते 12 चे वर्ग सुरू होणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत.

ज्या गावांत मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल तसेच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमताने केला असेल, अशा गावांत इ.8 ते 12 चे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल.असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

शाळा सुरु करण्यापूर्वी राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यास ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती जबाबदार असेल. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेतील. शाळा सुरु होण्यापूर्वी संबंधित शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण प्राधान्यक्रमाने करून घ्यावे. सध्याच्या आव्हानात्मक काळात चला आपण सर्वजण एकत्र येऊ, आपलं भविष्य सुरक्षित करू! आपल्या मुलांचे शिक्षण अविरत सुरु राहणे; त्यांचे आरोग्य व सुरक्षा ह्या बाबी सदैव आमच्या निर्णय प्रक्रियेत प्राधान्यक्रमाने प्रथम स्थानी असतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles