खा.डॉ.प्रीतमताई मुंडे व मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आष्टी येथे केली रेल्वे मार्ग कामाची पाहणी.
आष्टी (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला रेल्वे मार्ग ज्याचे काम प्रगतीपथावर असून जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून वेळोवेळी आवश्यक निधी या रेल्वेमार्गासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे.
st driver attempts sucide एस.टी.चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न!
आज दि.२८ रोजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे व मा.आ.भीमसेन धोंडे यांनी अहमदनगर- बीड – परळी या रेल्वेमार्गाचे आष्टी तालुक्यात सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन आष्टी (चिंचाळा) येथील रेल्वेस्टेशन कामाची पाहणी केली. तसेच या पाहणी नंतर आष्टी तहसिल कार्यालयात रेल्वे मार्ग काम, जमिन संपादन व संबधित जमिन मालक शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच मावेजा यासह सर्वच विषयावर खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी आढावा बैठक घेऊन संबधित अधिकारी यांना काम जलद गतीने करण्याच्या सुचना दिल्या.
या वेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी देखील अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या आहेत. यावेळी आ.बाळासाहेब आजबे, जि.प.सदस्य रामदास बडे, पाटोदा उपविभागीय दंडाधिकारी सुशांत शिंदे, आष्टी तहसीलदार राजाभाऊ कदम, पाटोदा पं.स. सभापती सुवर्णाताई लांबरुड, अँड.वाल्मिक निकाळजे, शंकर देशमुख, माजी जि.प.अध्यक्षा सविताताई गोल्हार, डॉ.शैलजा गर्जे, बाबू कदम, माजी सरपंच आण्णासाहेब लांबडे, रेल्वेमार्ग संबधित विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.