संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे औपचारिक प्रस्थान
नाशिक । प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पायी वारी प्रस्थान सोहळा या दिवशी कोविड परिस्थितीमुळे औपचारिक स्वरूपात साजरा झाला.
त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून निघालेली निवृत्तीनाथांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये विसावली.कोविड स्थितीमुळे शासनाच्या नियमानुसा आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी एसटी बस द्वारे चाळीस वारकर्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
तोपर्यंत या कालावधीत मंदिरामध्ये पालखीचा नित्य पूजाअर्चा कीर्तन कार्यक्रम संपन्न होईल. आज वटपौर्णिमेच्या दिवशी टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग गात मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पालखीचे औपचारिक प्रस्तान ठेवण्यात आले. शासनाच्या नियमानुसार एसटी बस द्वारे निघणाऱ्या पालखीबरोबर 60 वर्षा खालील 40 वारकऱ्यांना आज परवानगी देण्यात आली आहे.
औपचारिक प्रस्तान सोहळ्यास दरम्यानही मंदिरांमध्ये मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आल्यामुळे आलेल्या अनेक वारकऱ्यांचे मी मंदिराच्या पायरीवर डोकं टेकवून दर्शन घ्यावे लागले.
obc scholarship,मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूरAnil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक