आष्टी
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महेश सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल, या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आपला कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना बाहेर ऊस द्यावा लागत होता. हा कारखाना सुरू झाल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे असे माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील महेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ या हंगामातील २६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा सोमवारी कारखाना परिसरात करण्यात आले. महाराष्ट्र भूषण माजी आ.भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात धार्मिक विधी पार पडल्यानंतर बॉयलरचे अग्निप्रदीपन ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू महाराज, ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल आणि ह.भ.प. अशोक महाराज भोसले यांच्या शुभहस्ते धार्मिक विधीने संपन्न झाले. नव्या हंगामाच्या प्रारंभामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रशासन आणि कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले, की, कारखान्याचे लायसन गेले होते त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केले. शेतकऱ्यांनो थोडा धीर धरावा व आपल्याच कारखान्याला उस घालून सहकार्य करा. कारखान्यासाठी लागणाऱ्या पाण्याची काळजी करु नये.पाटोदा शिरूर या तालुक्याला पाणी मिळावे यासाठी अनेक महिन्यांपासून मागणी करीत आहोत. खाजगी हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे द्यावेत. शेतकऱ्यांनी स्थलांतर करु नये. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. राजकारणात कोणीही एकमेकांवर
व्यक्तिगत टिका करू नये.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अजयदादा धोंडे, व्हाईस चेअरमन दादासाहेब जगताप, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सभापती नियामत बेग, चेअरमन राजेश धोंडे, ह.भ.प. दिनकर तांदळे महाराज,माजी जि. प. सदस्य दशरथ वनवे, माजी पं. स.सदस्य परमेश्वर शेळके,
बाबुलाल भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, दिपक घुमरे, संचालक रत्नदिप निकाळजे, विधाते, वाघुले,राजाराम नन्नवरे, अंकुश मुंढे, पांडुरंग गावडे, माजी सरपंच संतोष चव्हाण,राजाबापु नलावडे, अण्णासाहेब चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल नाथ व इतर उपस्थित होते .
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले की, . येत्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. कारखाना सुरू करुन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी खुप मोठे धाडस केले आहे. आम्ही बीड येथे मोर्चा काढल होता, त्यात आमचे काही हित नव्हते. शेतकऱ्यांसाठी काढला होता. कोणाच्या विरोधात काढला नव्हता.अखिल भारतीय वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले की, कृषी प्रधान देशातील शेतकरी सुखरूप झाला पाहिजे.
सध्या दुष्काळ असला तरी कारखान्याला यश येणार आहे, त्यामुळे शेतकरी होतील खुष होतील. कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची उर्जा शक्ती आहे. पुन्हा कारखाना सुरू करण्याची ताकद या भीमाकडेच आहे. याप्रसंगी ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी सांगितले की, हा कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचे जिवनमान आहे, शेतकऱ्यांच्या जिवनाची रक्तवाहिनी आहे.
ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापु महाराज यांनी सांगितले की, मोडीत निघालेला कारखाना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी तन मन धनाने सुरू केला आहे. तुम्ही खुप कष्ट सहन करुन कारखाना सुरू केला आहे. ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अथक प्रयत्नातून कारखाना सुरू होत आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या चुली पेटविण्याचे काम त्यांनी केले आहे.ह.भ.प. अशोक महाराज भोसले यांनी सांगितले की, आपल्या भागातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊस द्यायचा म्हणजे खुप अडचणी येतात.
आपला कारखाना सुरू झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. ह.भ.प. आंधळे महाराज यांनी सांगितले की, कारखाना सुरू झाल्यामुळे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल. कोण काय म्हणतंय याकडे लक्ष न देता काम करीत रहा आणि शेतकऱ्यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पाठीमागे उभे रहा.
याप्रसंगी माजी संचालक दत्तोबा शिंदे, भाऊसाहेब घुले, संजय मेहेर, सुकलाल मुथा, विजय मेहेर,माजी सरपंच झुंबर चव्हाण, धैर्यशील थोरवे,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते,भाऊसाहेब घुले, विक्रम पोकळे, धैर्यशील थोरवे,सतिश झगडे, हरिभाऊ जंजिरे, अरुण सायकड, माजी सभापती बाबासाहेब आंधळे,अशोक साळवे,माजी संचालक बाळासाहेब वाघुले, भागिनाथ विधाते,
स्वामी सानप, राजपाल शेंडगे, मोहन कर्डीले, बाळासाहेब खुडे, लिंबराज कर्डीले, चेअरमन बाळासाहेब शिंदे,सुदाम झिंजुर्के, चेअरमन शाम सांगळे, मच्छिंद्र शेळके, पंढरीनाथ चंदनशिव, सुनील शिंदे, संदीप नागरगोजे विठ्ठल लांडगे,कुंडलीक आस्वर, बाळासाहेब भुकन,भाऊसाहेब देसाई, बाबासाहेब तावरे, मच्छिंद्रनाथ शेळके, वैभव बडे,तुकाराम चव्हाण,आबासाहेब तावरे,
बबनराव सांगळे, गहिनीनाथ आंधळे, सदाशिव आंधळे, अमोल चौधरी, सोनाजी गांजुरे,सदाशिव पवने, गौतम ससाने,कार्यकारी संचालक गिरीश झगडे,संतोष गोल्हार यांच्या सह कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी थोरवे यांनी केले. उपस्थितांचे आभार माजी शिक्षण सभापती नियामत बेग यांनी मानले.
