Homeमहाराष्ट्र न्यूजनवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखों भाविकांनी घेतले अंबाबाई दर्शन

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखों भाविकांनी घेतले अंबाबाई दर्शन

कोल्हापूर

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुळ शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात झाली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं भाविकांसाठी विशेष नियोजन करण्यात आले. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रुपात बैठी पूजा बांधण्यात आली होती.


नंदादेवी सोन्याप्रमाणे अंगकांती असलेली, सोन्याप्रमाणे सुंदर वस्त्र धारण केलेली, सुवर्णवर्णाची आणि उत्तम सुवर्णालंकारांनी अलंकृत असलेली देवी आहे. कमळ, अंकुश, पाश आणि शंख धारण करणारी, चतुर्भुजा, सोन्याच्या कमळावर विराजमान असलेली इंदिरा, कमला, लक्ष्मी, श्री या नावांनी ओळखली जाणारी देवी अशी तिची महती वर्णन केली आहे. आजची पूजा अजिंक्य मुनिश्वर वेदांग मुनिश्वर व सोहम दिलीप मुनिश्वर यांनी बांधली.

यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, 116 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत आहे. आजपासून आदिशक्ती आई अंबाबाईच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्यानं संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झालंय. आज रविवारी सार्वजनिक सुट्टी आल्रयानेदुपारनंतर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आदीशक्तीच्या जागांसाठी देवस्थान समिती सज्ज….

भाविकांच्या सोयीसाठी भवानी मंडप परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीतून गाभारा दर्शनाची रांग लावण्यात आली आहे. तसेच गरुड मंडपाशेजारी मुखदर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परगावाहून येणाऱ्या भाविकांना पार्कींग, स्वच्छतागृह, बॅगेज लाॅकर अशा सगळ्या सुविधा दिल्या आहेत.

नऊ दिवस आदिशक्तीचा जागर होणार असून, त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सज्ज असल्याची माहिती समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments