Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यातील आष्टीत जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

बीड जिल्ह्यातील आष्टीत जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

बीड

beed ashti drought visit collector दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शुक्रवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पिके, पाणीटंचाई आणि पशुधनाच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला आवश्यक मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी चिंचपूर येथे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा आणि आवश्यक बाबींची माहिती घेतली. त्यानंतर विविध ठिकाणी पिकांची पाहणी करून शेतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पांढरी येथे जनावरांच्या खुल्या गोठ्याची पाहणी करून पशुधनासाठी उपलब्ध चारा, पाणी आणि अन्य सुविधांची माहिती घेतली.

दौऱ्यानंतर तहसील कार्यालयात महसूल, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तीनही तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

या भागात दूध उत्पादक शेतकरी आणि दुधाळ पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा डेपो उभारण्याची आवश्यकता आमदारांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील, सहाय्यक आयुक्त पशुधन विकास अधिकारी उपेंद्र मुंडे, नायब तहसीलदार माडेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments