रोजगार हमी योजना,वर इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी खर्च करुन अत्यल्प प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून करोना या महामारीने थैमान घातलेले आहे.
तालुक्याचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नी अजिबात लक्ष नसल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड़ यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील असंख्य जनतेच्या हाताला कामे नाहीत पर्यायाने आपले कुंटुंब कसे बसे चालविण्याचे कसरत करावी लागत आहे.
याकडे अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे अजिबात लक्ष नाही.
अशातच जिल्ह्रातील इतर तालुक्यात मात्र सन 2020-21रोजगार हमी योजना वर जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात खर्च केलेला आहे.
व रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे असे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्रातील इतर तालुक्यांमध्ये जामखेड – 6.84 कोटी, कर्जत -8.95 कोटी, नगर- 4.48 कोटी, पारनेर – 8.90 कोटी, पाथर्डी- 5.82 कोटी, संगमनेर-5.33 कोटी, शेवगांव- 4.72 कोटी, श्रीगोंदा- 5.65 कोटी रुपये मात्र अकोले तालुक्यासाठी फक्त 3.62 कोटी रुपये.
अकोले तालुक्यासाठी इतका कमी खर्च का करण्यात आला आहे ?
याकडे अकोले तालुक्याचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
या तुलनेत अकोले तालुक्यात मंजुरांची संख्या लक्षणिय आहे.
परंतु त्यांच्या हाताला कामे नाहीत, आपले कुंटुंब कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
अकोले तालुक्यात भात आवणी, नागली, वरई आवणी इत्यादीची कामे आता सुरु होत आहे.
ही आवणी कशा प्रकारे करावी बैल जोडीने नांगरणी करणे आणि ट्रक्टरने नांगरणी करणे यासाठी फार मोठया प्रमाणात खर्च करावा लागत आहे हा खर्च कसा करावा असा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा आहे.
कारण हाताला कामे नाहीत हा आवणीचा खर्च कसा करावा की सावकारांकडून कर्ज घ्यावेत, पण घेतलेले कर्ज कसे फेडायचे असाही प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहे.
तरी अकोले तालुक्यासाठी रोजगार हमी योजना कामे जास्तीत जास्त उपलब्ध करुन दयावेत व भात आवणी, नागली व वरई आवणी आणि बैल जोडीने नांगरणी करणे, ट्रक्टरने नांगरणी करणे ही सर्व कामे रोजगार हमी योजनेत बसून त्यासाठी तातडीने मंजुरी देवून येथील जनतेला मदतीचा हात दयावा तालुक्यातील जनतेला उपासमारीपासून वाचवावे अशी विनंती माजी आमदार पिचड़ यांनी केली आहे.