बीड जिल्ह्यात कोविड मयतांची यादी लपवली जातेय

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी दि ६जून

कोविड मृत्यूंची संख्या प्रशासनाकडे असलेल्या पोर्टल वर 108 आहे माञ प्रत्यक्षात ही संख्या 333 आहे.प्रशासन मृत्यूंची माहिती लपवत असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे मृत व्यक्तींची मुले केंद्र सरकारच्या मदतीपासून वंचित राहू शकतील असेही त्यांनी सांगितले.

आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीड जिल्ह्याची आकडेवारी प्रशासनाने पुढील दोन दिवसात कोविड मृत्यूंची संख्या तपासून घ्यावी अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनाथ मुलांच्या नावे घोषीत केलेल्या 10 लाख रुपये मदतीपासून अनेक कुटुंब मुकण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे पोलीसांची हप्तेखोरी आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात मोठी डोकेदुखी ठरत असल्याने पोलीस प्रशासन दिसत असून आंधळे झाल्याची टिका आ.सुरेश धस यांनी केली.

आणखी वाचा : अहमदनगर जिल्ह्यात सोमवार पासून सर्वच सुरु

आ.धस म्हणाले कि,बीड जिल्ह्यात अनेक लोक पाॕझीटिव्ह झाले यातून त्यांचा मृत्यूही झाला.माञ स्थानिक नगरपंचायत,ग्रामपंचायत स्थरावर नोंदच न झाल्याने नेमके किती रुग्णांनी आपला जीव गमावला याची नोंद बीड जिल्हा प्रशासनाकडे नाही.तसेच सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार एखादी व्यक्ती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तर तो गुन्हा नोंदवून घेणे पोलीसांचे काम आहे.तद्नंतर त्या प्रकरणाची चौकशी होणे क्रमप्राप्त असते.मी चार वेळा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे.परंतु माझी फिर्याद जर पोलीस प्रशासन घेत नसेल तर सामान्य नागरिकांना हे पोलीस प्रशासन काय वागणून देत असेल याचा विचार न केलेलाच बरा.म्हणत आ.धस यांनी पोलीसांवर निशाना साधत कोरोनाच्या कालावधीत आष्टी-पाटोदा-शिरुर सह आदी ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत. गावोगाव मटके सुरु आहेत.धानोरा येथे मटका किंग आहे तो पोलीसांना सापडत नाही,गोवंश हत्या सर्रास होत आहेत.पोलीसांची अशा काळातही हप्तेखोरी सुरु असून या सगळ्या प्रकाराकडे पोलीस डोळेझाक करत असल्याचा आरोपही आ.धस यांनी केला.

सद्यस्थितीत मान्सून सुरु झाल्याचे या आठवड्यातील चिञ असल्याने शेतकरी 
वर्ग आता पेरणीकडे वळत आहे माञ दुसरीकडे युरीयाचा काळा बाजार
 जोरात सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने याची चौकशी होऊन
 संबंधित कृषी चालकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आ.धस 
यांनी केली.मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.शिवाय ओबीसींचे राजकीय
 आरक्षण देखील पुर्ववत व्हावे यासाठी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर
 महाराष्ट्रात कुठेच होणार नाही इतका भव्यदिव्य मोर्चा काढणार असल्याचेही
 आ.धस म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles