अहमदनगर
राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले नाही तर बाधितांची संख्या वाढून पुन्हा आपल्याला प्रतिबंध आणावा लागेल. त्यामुळे कोविड सुसंगत वर्तणुकीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हावासियांना केले आहे.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींबाबत आढावा बैठक घेतली. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्री साईबाबा विश्वस्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, साईबाबा विश्वस्त संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
आणखी वाचा :मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. सध्या राज्य शासनाने ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्ह्याच्या रुग्ण बाधित होण्याचा दर आणि त्या जिल्ह्यात ऑक्सीजन बेडसची उपलब्धता या निकषांवर काही निर्बंध शिथील करुन व्यवहार पुन्हा सुरु करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा गत आठवड्यातील रुग्ण बाधित होण्याचा दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सीजन बेडस वर असणाऱ्या रुग्णांची संख्या आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण का टक्क्यांच्या आतमध्ये असल्याने आपला समावेश टप्पा क्र. हीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत त्याचा गंभीर मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु करता येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनव आदेश जारी करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या व्यवहार पूर्ववत करण्याचा निर्णय झाला असला तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. पुन्हा बाधितांची संख्या वाढायला लागली तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लागू करावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन संभाव्य रुग्णवाढीनुसार नियोजन करावे लागणार आहे. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली. जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प फटका आपल्याला बसला. अतिशय वेगाने ही लाट आली. ऑक्सीजन ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उभारले जात आहे. त्याचे काम सुरु झाले आहे. याशिवाय, शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सीजन बेडसची व्यवस्था, बालरुग्णासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. त्यासंबंधात उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सीजन उपलब्धता, ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन आणि तयारी आतापासूनच केली जात आहे.
पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाटी राज्य शासन पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात किमान ८० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, असे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७ लाख १५ हजार १४२ व्यक्तींचे लसीकरण कऱण्यात आले आहे.
सध्या कोरोनाबरोबरच आता राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत २२५ रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स सध्या जिल्ह्यात उपलब्ध असले तरी अधिकची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने ती मिळविण्यासाटी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी कोरोना सद्यस्थितीविषयी माहिती दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी कऱण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि त्यासाठी आवश्यक बाबींसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांनी सादरीकरण केले.