परळी दि 3 जून
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवरांनी गोपीनाथ गड येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मुंडे यांच्यावर आधारित पोस्टल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरूवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून पोस्ट पाकिटाचे विमोचन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले असून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बानवकुळे यांनी हिंगोलीहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याहून सहभागी झाले होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतम मुंडे व खा. डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. तर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुंबई प्रदेश कार्यालयातून केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, संघटनमंत्री शिवप्रकाशजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व सहकार्यालय सचिव भरत राऊत, माध्यम प्रमुख विश्वास पाठक, मीडिया सह-संयोजक ओमप्रकाश चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.
आणखी वाचा : बारावीचे सर्व मुले पास, बारावीची परीक्षा रद्द
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. आज गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले.तसेच आज गोपीनाथ मुंडे यांच्या नावे पोस्टल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले. आहे.या कार्यक्रमाला गडावर माजी मंत्री महादेव जानकर , खासदार सुजय विखे, आमदार मोनिका रांजळे , आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह आजीमाजी खासदार आणि आमदारांनीही गोपीनाथ गडावर दर्शनासाठी गर्दी केली.