मनोज सातपुते
जगातील सर्वात मोठे माध्यम असलेल्या युट्युब ने आता नवीन पॉलिसी एक जूनपासून लागू करण्याचे ठरवले आहे. युट्युबच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युट्युबर्स साठी ही एक नवीन घोषणा युट्युब केली असून आता तुमचे युट्युब चॅनेल केव्हाही युट्युब मोनेटाइज करू शकते. या संबंधीचा अधिकार यूट्यूबने स्वतःकडे राखून ठेवला आहे.
यूट्यूब ने नवीन पॉलिसी आपल्या सर्व युट्यूबर्स ला एका मेलद्वारे कळवले आहे यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी यूट्यूब ने सांगितले असून या यूट्यूब पॉलिसीचे भंग करणाऱ्या युट्युब चालकांना आगामी काही काळात आपले चैनल बंद करावे लागणार आहे.
युट्युब चॅनेल चे नवीन पॉलिसी
युट्यूब ने जाहीर केल्यानुसार आता प्रत्येक व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीची माहिती युट्युब वर दाखवायचे असेल तर त्या व्यक्तीची परवानगी असणे आवश्यक आहे यालाच यूट्यूबने फेस रेकगनिशन असे म्हटले आहे .या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीविना अन त्याचा फोटो त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या संबंधीची माहिती आपण युट्युब वर दाखवू शकत नाही. जर अशा व्यक्तीने युट्युब कडे तक्रार केल्यास बंद पडण्याची शक्यता त्यामुळे युट्युबर्सला आगामी काळात याबद्दलची काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या नंतर अशा प्रकारच्या तक्रारी युट्युब कडे गेल्यामुळे युट्युब ला आपली पॉलिसी बदलावी लागली आहे.
यूट्यूब च्या दुसऱ्या पॉलिसी नुसार यूट्यूबने चॅनल मोनेटायझेशन चे हक्क स्वतः कडे ठेवले आहे. म्हणजेच आता युट्युब कोणतेही चॅनेल मोनेटाईझ करू शकतो यासाठी लागणारा जो 1000 सबस्क्रिबर्स आणि 4000 मिनिटे वॉच टाईम ही कुठल्याही चॅनलला गरज असणार नाही मात्र हे करत असताना यूट्यूब ने यामध्ये दाखवले जाणाऱ्या जाहिराती आहेत त्याचे त्यामधून येणारे उत्पन्न स्वतःकडे ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्या विरुद्ध तुम्ही काही करू शकत नाहीत जर तुम्हाला युट्युब ची ही पॉलिसी मान्य नसेल तर तुम्हाला युट्युब सोडावे लागेल.तुमचे 1000 सबस्क्रिबर्स आणि 4000 मिनिटे वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे सुरू होतील.
यूट्यूब च्या तिसऱ्या पॉलिसी नुसार जर तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या बाहेरचे राहणारे असाल आणि तुम्ही युट्युब वर जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला सर्वप्रथम टॅक्सचा फॉर्म भरून द्यावे लागेल अन्यथा या यूट्यूब च्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 24 टक्के रक्कम ही युट्युब आपल्याकडे ठेवून घेणार आहे. या तीन महत्त्वाच्या गोष्टीची अनाउन्समेंट युट्युब ने आपल्या नवीन पॉलिसीच्या धोरणांमध्ये केलेले आहेत. हे पॉलीसीचे धोरण यापूर्वीच 2020 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका मध्ये लागू करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर एक जून पासून या पॉलिसी अमेरिकेतर देशांना लागू असणार आहे.
त्यामुळे नवीन यूट्यूब असला जरी मोनेटाइज करण्याची संधी असली तरी मात्र त्यामधून उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट या पॉलिसी मधून दिसून येत आहे.
आणखी वाचा: वर्ध्यात होणार ब्लॅक फंगस वरील इंजेक्शन ची निर्मिती
[…] […]