सहा गावात अँटीजन चाचण्यात 110 पॉझिटिव्ह आढळले
आष्टी दि 11 मे प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या अँटीजन कोरोना चाचण्यांमध्ये तब्बल 110 कोरोना बाधित आढळून आले असून कड्यात 33 जण बाधित आढळले.या अँटीजन कोरोना चाचण्यामुळं कोरोना मुक्त गावे होण्यास मदत होणार आहे.
आष्टी तालुक्यातील कोरोना रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.तालुक्यात कोरोना नष्ट करण्यासाठी आरोग्य विभाग ,प्रशासन आणि पोलीस एकत्र काम करत आहेत.त्यांना आमदार सुरेश धस यांची साथ मिळत असून त्यांनी अँटीजन टेस्टिंग किट उपलब्ध करून दिल्याने विविध गावात टेस्टिंग कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.
तालुक्यातील सहा ठिकाणी टेस्ट कॅम्प घेण्यात आला .त्यामध्ये 110 जण पॉझिटिव्ह आढळून आले.एकूण 780 टेस्टिंग करण्यात आल्या.
आष्टी येथे 282 टेस्ट 40 पॉझिटिव्ह, कडा येथे 160 टेस्ट 33 पॉझिटिव्ह धानोरा येथे 75 टेस्ट 08 पॉझिटिव्ह करहेवाडी 38 टेस्ट 03 पॉझिटिव्ह सावरगाव 56 टेस्ट 06 पॉझिटिव्ह डोईठाण 169 टेस्ट 20 पॉझिटिव्ह
कोरोना टेस्ट चळवळ गावागावात राबविल्यास कोरोना बधितांना शोधून त्यांच्यावर उपचार होऊ शकतो आणि वाढता कोरोना प्रसार रोखण्यासाठी मदत होणार आहे.त्यासाठी गावागावात ही चळवळ पुढे जायला हवी.
आणखी वाचा:सहा रेमेडिसीवीयर इंजेक्शन सह काळाबाजार करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली.