कोरोनाच्या रूग्णांना तात्काळ मदत मिळावी म्हणून तहसिलकार्यालयात वॉर रूमची स्थापना-तहसिलदार
आष्टी दि 14 एप्रिल,प्रतिनिधी
तालुक्यात दिवसेंदिवस कोव्हिडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना जी काहि तांञिक अडचणी असतील त्या आता तहसिल मधून एका फोनवर सोडविण्यासाठी वॉर रुमची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज मंगळवार दि.13 रोजी तहसिल कार्यालयात नैसर्गिक अपत्ती साठी (वॉर रूम) ची स्थापना करण्यात आली असून,या वार रूम मधून तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी येणा-या अडचणी तसेच कोव्हिड रूग्णालयात येणा-या अडचणी,गावात एकादा कोरोना बाधित व्यक्ती असून,फिरत असेल तर त्याची माहिती तहसिल कार्यालयाच्या या वॉर रूमला कळविले तर एक तासात त्यांचा संबंधित यंञणेद्वारे त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.यासाठी ही सेवा चोवीस तास सूरू असून,याकामी दोन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही तहसिलदार कदम यांनी सांगितले.
अधिक वाचा:रेम्डीस्वीर चा काळाबाजार करणारी टोळी पकडली;पोलीस प्रशासनाची कारवाई
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही तहसिल कार्यालयात कोरोना बाधीत रुग्णांना उपचारा दरम्यान येणा-या अडचणीसाठी महसूल विभागाच्या वतीने वार रूम सुरू केले असून,त्याचा क्र.02441-295073 व 295 542 ह्या क्रमांकावर आपली अडचण सांगून यावर संबंधीत विभागाला कळवून एक तासाच्या आत नागरिकांचा प्रश्न मार्गि लावला जाईल.
-राजाभाऊ कदम,तहसिलदार आष्टी