रेम्डीस्वीर चा काळाबाजार करणारी टोळी पकडली;पोलीस प्रशासनाची कारवाई
अहमदनगर दि 13 एप्रिल प्रतिनिधी
कोरोना पेशंटला लागणाऱ्या रेम्डीस्वीर इंजेक्शन ची काळाबाजार होत असल्याचे उघड झाले असून भिंगारजवळच्या वडारवाडी येथे रेम्डीस्वीर इंजेक्शन आढळून आल्याने पोलीस प्रशासनानं कारवाई केली आहे.याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलमधील डॉ कौशल्या किशोर मस्के, डॉ किशोर दत्तात्रय म्हस्के यांच्याशी संगनमत करून चैतन्य मेडिकल स्टोअर्स म्हस्के हॉस्पिटल भिंगार येथून विकले जात असल्याचे पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला असता रेम्डीस्वीर इंजेक्शन हे चढ्या भावाने काळ्याबाजारात 12000 रुपये किमतीला विक्री करताना मिळून आले.
चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रोहीत पवार, प्रशांत आल्हाट या दोघांना अटक केली आहे. डॉक्टर दांपत्य डॉ.किशोर म्हस्के आणि डॉ.कौशल्या म्हस्के हे पसार झाले.
म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती तसेच हॉस्पिटलमधील मेडिकलचे १४ हजार रुपयांचे बिलही त्यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी आज रात्री साडेदहा वाजता फौजफाट्यासह म्हस्के हॉस्पिटल येथे छापा घातला. या छाप्यात पोलिसांना मेडिकलमध्ये साठवून ठेवलेले रेमडेसिवीरचे १४ इंजेक्शन मिळाले आहेत. रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.
आणखी वाचा:दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या; मे आणि जून मध्ये होणार