मुंबई दि 3 एप्रिल ,प्रतिनिधी
1 ली ते 8 च्या वर्गातील सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
केंद्र सरकारच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्ष भरापासून शाळा भरल्याच नाहीत. इयत्ता 5 ते 8 वीच्या शाळा काही भागात सुरू झाल्या आणि बंद पण झाल्या.काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.त्यामुळे सरसकट 1 ली ते 8 पर्यंतची मुले पास करून त्यांना 9 मध्ये पाठविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे
पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून 9 वी आणि 11 वी साठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा:ऑनलाईन पूजा आणि दर्शनाने साजरी झाली कानिफनाथांची रंगपंचमी