बीड दि १ एप्रिल, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना मीटर कमी जास्त होत आहे. मात्र यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ३५० च्या भोवताली फिरताना दिसत आहे. गेल्या सात दिवसातील कोरोना मीटर पाहता हे प्रमाण सरासरी ३५० च्या आसपास असताना दिसत आहे. आजही बाधितांची संख्या ३९३ इतकी आली आहे.
गेल्या २६ मार्च पासून बीड जिल्ह्यात संपूर्ण कडकडीत टाळेबंदी करण्यात आली असली तरी कोरोना बाधितांची संख्या सातत्याने ३५० पेक्षा कमी जास्त होताना दिसत आहे. २६ मार्च ते १ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारी वरून संख्या तीनशे पेक्षा जास्त दिसत आहे. यामध्ये शासकीय कार्यालये, शाळा, जिल्हा परिषद, जिल्हा कारागृह, अंबेजोगाई मेडिकल परिसर, खासगी रुग्णालये,एसटी डेपो, एसटी स्टेंड, पोलीस स्टेशन यांचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातून २५८ बाधित रुग्ण बरे होऊन गेले तर त्यापेक्षा जास्त ३९३ बाधित आले आहेत.
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असून मृत्यू दर २.४८ टक्के इतका झाला आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील कोणत्या तालुक्यात किती संख्या आली ?
अंबेजोगाई ६५ ,आष्टी ४५ ,बीड १२७, धारूर ४, गेवराई ११ ,केज ३३,माजलगाव ३४,परळी ३४,पाटोदा २६,शिरूर ५, वडवणी ९, यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बीड अंबेजोगाई परळी आणि आष्टी येथील रुग्णांची संख्या वाढत आहे.
बीड जिल्ह्यातील गेल्या सात दिवसातील कोरोना मीटर
१ एप्रिल ३९३ ३१ मार्च ३२५ ३० मार्च ३१८ २९ मार्च ३८३ २८ मार्च २८४ २७ मार्च ३७५ २६ मार्च ३८३
आष्टी तालुक्यातील कोणत्या गावात किती आले ?
सालेवडगाव २, कडा कारखाना १, आष्टी ५, पिंपरखेड ४, कडा १०, कासारी 3, सांगवी पाटण १, केळसांगवी १, जामगाव ५,कोयाळ १, डोईठाण ४, सुलेमान देवळा 3, डोंगरगण १, आणि टाकळी ४ यांचा समावेश आहे.
कोरोना आता घराघरातून दिसत आहे. यापूर्वी हे प्रमाण गावागावात दिसत होते आता हे सुपर स्प्रेडींग होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना होऊन विचार करण्यापेक्षा न होण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
आणखी वाचा : १३३८ रुग्णांना डिस्चार्ज , १६८० रुग्णांची भर