समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-बस धडकेत चालकाचा मृत्यू, ३० प्रवासी वाचले

छत्रपती संभाजीनगर

Samruddhi highway travels burn समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. वैजापूर परिसरात मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जाणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसला एका ट्रकची जोरदार धडक बसली.

या अपघातानंतर बसला आग लागली, ज्यात बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. साईराम ट्रॅव्हल्सची बस (MH 19 CX 3015) पहाटे सुमारे ३.३० वाजता नागपूर कडे जाणाऱ्या समोरील ट्रक (CG 04 M 8711) चालकाने ओव्हरटेक करत अचानक ब्रेक मारल्याने बस त्यावर आदळली. धडकेनंतर बसने तात्काळ पेट घेतला. बसमध्ये चालकासह एकूण ३० प्रवासी होते.

अपघात होताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत इमर्जन्सी विंडोच्या माध्यमातून बसमधून बाहेर पडत आपले प्राण वाचवले. मात्र चालक अमोल शेलकर (वय ३८) अपघातानंतर बसमध्येच अडकून पडले. धुरामुळे श्वास गुदमरल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून त्यातील गणेश नरवटे (वय अंदाजे ४०) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन केंद्राच्या पथकांनी आग आटोक्यात आणत बस पूर्णपणे विझवली. जखमी प्रवाशांनाही घाटी रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles