श्रीगोंदा नगरपरिषद भाजपच्या गटनेतेपदी सुनिताताई खेतमाळीस तर उपगट नेतेपदी मिराताई शिंदे

सचिवपदी सौ. वंदना संग्राम घोडके,
खजिनदारपदी सौ. अश्विनी प्रवीण काळे

ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नगरसेवकांनी सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे भाजप गट नोंदणीसाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला.

या गट नोंदणी प्रक्रियेत नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीम. सुनिताताई खेतमाळीस यांची भाजप गटनेतेपदी, तर नगरसेविका श्रीम. मिराताई शिंदे यांची उपगटनेतेपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. याचबरोबर सचिवपदी सौ. वंदना संग्राम घोडके आणि खजिनदारपदी सौ. अश्विनी प्रवीण काळे यांचीही एकमताने निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपच्या सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. या बैठकीस आमदार विक्रम पाचपुते तसेच अॅड. प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे गटनेते श्रीम. सुनिताताई खेतमाळीस यांनी सांगितले. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सर्व नगरसेवक संघटितपणे आणि कटिबद्धपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह माजी नगरसेवक संग्राम घोडके, संजय खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, दिलीप खेतमाळीस, नानाभाऊ आनंदकर, विकास बोरुडे, प्रविण काळे, अक्षय अनभुले, ऋतिक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडीनंतर श्रीगोंदा शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles