ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा –
Shrigonda share market श्रीगोंदा शहरात शेअर मार्केटमधील मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेक सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांकडून रक्कम उकळल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
या प्रकरणातील एका बाधित व्यक्तीने येत्या काही दिवसांत संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माहिती आहे.
दरम्यान, या कथित गुंतवणूक व्यवहारामागे कोण आहे, हे तपास यंत्रणा लवकरच उघड करणार असून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनीही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“स्रोत : – “मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार”

