सप्तशृंगी गड घाटात कार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू,

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.१५ बी.एन. ०५५५) खाली कोसळली आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील २ महिला ४ पुरुष यांचा समावेश आहे.

सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार आज सायंकाळी ५: ३० वाजेच्या सुमारास दरीत कोसळली आहे. गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला आहे. संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. इनोव्हा कार १००० फूट खोल दरीत कोसळली आहे, खोलदरी आणि अंधार पडल्याने काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे.

या अपघातातील मृतांची नावे

विठ्ठल पटेल, वय ६५
पचन पटेल, वय ६०
मनी बेन पटेल, वय ७०
किर्ती पटेल, वय ५०
रशिला पटेल, वय ५०
लता पटेल, वय ६०

सप्तश्रृंग गडावरील अपघात जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्य सुरू

सप्तश्रृंग गड (ता. कळवण) येथे आज सायंकाळी झालेल्या अपघातग्रस्तांना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.

सप्तश्रृंगी गड घाटात आज सायंकाळी कार (MH15BN0555) सुमारे १००० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असल्याची प्रारंभिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरू आहे.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे आदींसह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे हे स्थानिक पातळीवर मदत कार्य करणाऱ्या सर्व पथकाच्या संपर्कात आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles