श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज !

अहिल्यानगर, दि. १

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी १ व सदस्य पदासाठी २२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.

प्रभाग क्र. ७ मधील जागा ‘ब’ साठीची निवडणूक प्रक्रिया मात्र २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या परीपत्रकानुसार स्थगित करण्यात आली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रात एकूण २८,३२६ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १४,२५६ पुरुष तर १४,०७० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सोयीसाठी ३२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण १८६ कर्मचारी नेमण्यात आले असून त्यापैकी ६ सेक्टर अधिकारी आणि २ राखीव कर्मचारी आहेत.

मतदान पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी ४ एसटी बसेस, तसेच १ मिनीबस आणि ७ कार वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी, मतदारांची वाढती गर्दी झाल्यास अतिरिक्त बसण्याची व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदानापूर्वी आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी दि. १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यानंतर प्रचारबंदी लागू होणार असून आचारसंहिता कक्षाचे कर्मचारी व दक्षता पथक सर्व मतदारसंघात नियमित पेट्रोलिंग करत आहेत.

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार आहे. सर्व मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे पार पडेल, अशी माहिती ही श्री. चिंचकर यांनी दिली.

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज !

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची माहिती

अहिल्यानगर, दि. १ – श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १ व सदस्य पदासाठी २२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.

प्रभाग क्र. ७ मधील जागा ‘ब’ साठीची निवडणूक प्रक्रिया मात्र २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या परीपत्रकानुसार स्थगित करण्यात आली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रात एकूण २८,३२६ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १४,२५६ पुरुष तर १४,०७० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सोयीसाठी ३२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण १८६ कर्मचारी नेमण्यात आले असून त्यापैकी ६ सेक्टर अधिकारी आणि २ राखीव कर्मचारी आहेत.

मतदान पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी ४ एसटी बसेस, तसेच १ मिनीबस आणि ७ कार वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी, मतदारांची वाढती गर्दी झाल्यास अतिरिक्त बसण्याची व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदानापूर्वी आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी दि. १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यानंतर प्रचारबंदी लागू होणार असून आचारसंहिता कक्षाचे कर्मचारी व दक्षता पथक सर्व मतदारसंघात नियमित पेट्रोलिंग करत आहेत.

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार आहे. सर्व मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे पार पडेल, अशी माहिती ही श्री. चिंचकर यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles