Homeताज्या बातम्याशिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला स्थानिक प्रतिसाद; विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य

शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला स्थानिक प्रतिसाद; विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य


ऋषिकेश भास्कर सांगळे
श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा │

आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे. शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी पोटे शुभांगी मनोहर व प्रभाग क्र. ६ मधून शेख रुबिना अन्वर यांची उमेदवारी जाहीर झाली असून, स्थानिक पातळीवर दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे.

उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही उमेदवारांनी शहरातील प्रमुख समस्या—रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांची सुरक्षा व सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणी—यांवर लक्ष केंद्रित करत संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

पोटे शुभांगी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत शहराच्या विकासासाठी आपल्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली. तर प्रभाग ६ च्या उमेदवार शेख रुबिना अन्वर यांनी स्थानिक पातळीवरील महिलावर्ग, गोरगरिब आणि वंचित घटकांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा, महिला सक्षमीकरण व सेवा आधारित कार्यपद्धतीवर भर देण्याचे मत व्यक्त केले आहे.

स्थानिक राजकीय निरीक्षकांच्या मते, या निवडणुकीत विकासकामे, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा हे मुद्दे प्रमुख ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments