Homeताज्या बातम्या8 आणि 9 जुलै रोजी मराठवाड्यातील शाळा या कारणाने राहणार बंद

8 आणि 9 जुलै रोजी मराठवाड्यातील शाळा या कारणाने राहणार बंद


बीड

School closes on 8 and 9 July शिक्षक शाळा आणि शिक्षण संस्थेच्या विविध प्रश्नाच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाने दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी मराठवाड्यातील शाळा बंद राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरती संदर्भात शासनाने नियमावली केली आहे यानुसार कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचे निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. तसेच राज्यातील विनाअनुदानित शाळांना देत असलेल्या अनुदानाच्या संदर्भात 14 ऑक्टोबर रोजी शासनाने काढलेल्या जीआर नुसार अनुदानाची तरतूद याच अधिवेशनात करावी या मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज्य पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी हा शैक्षणिक बंद असणार आहे.
तसेच या दिवशी सर्व शिक्षक संघटना या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

वरील विषयास अनुसरून 5 जून 2025 पासून शिक्षक समन्वय संघामार्फत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अंशतः अनुदानित शाळांचे आंदोलन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असा शब्द दिला होता पण तरतूद झाली नसल्यामुळे राज्यभर अंशतः अनुदानित बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

तसेच शासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन सुद्धा या शिक्षकांची फसवणूक केली आहे त्यामुळे राज्यभर शिक्षकांच्या मनामध्ये असंतोष पसरलेला आहे. याचा निषेध म्हणून दि. 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून निषेध नोंदवीत आहोत. तरी शासनाने 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करून शाळांना अनुदान वितरित करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघटनेने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments