Homeताज्या बातम्यासंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण हिंगोलीत

संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण हिंगोलीत

हिंगोली


हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मंगळवार दिनांक 17 जून रोजी सायंकाळी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडले .

12 अश्वांच्या माध्यमातून पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती . हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथील संत नामदेव महाराजांचा पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.

नरसी नामदेव येथून पालखी हिंगोली कडे निघाली घोटा, सवड , केसापूर मार्गे पालखी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथे पोहोचली. हिंगोली येथील महाराजा अग्रसेन चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पूजन करून केले .

यावेळी आमदार संतोष बांगर , माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण , संस्थांनचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. टाळ- मृदंगाच्या गजरात , हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळा रामलीला मैदानावर पोहोचला.

या ठिकाणी पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण पार पडले . या पालखी सोहळ्याचा मुक्काम हिंगोलीत झाल्यानंतर बुधवार दिनांक 18 रोजी ही पालखी औंढा नागनाथ मार्गे रवाना होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments