52 व्या इफ्फी गोवा इथे अतिशय दिमाखदार सोहळ्यात झाले उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख चित्रपट कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या भव्य आणि रंगारंग सोहळ्याने गोव्यातील पणजी येथे 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात   आले.  या महोत्सवातील ओपनिंग चित्रपट  ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ (एल रे डी टोडो अल मुंडो) या ट्रेलर उद्घाटन सोहळ्यात  दाखवण्यात   आला.

 

 

चित्रपट रसिकांसमोर आपले मनोगत मांडतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतातील आणि जगभरातीलच सर्व चित्रपट निर्मात्यांना  52 व्या इफ्फी त  सहभागी होण्याची आग्रही विनंती केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतला,चित्रपटसृष्टीतले विविध रंग एकत्रित दाखवणारा हा सोहळा असून सर्वांनी इथे या, आणि या सोहळ्याचा भाग व्हा, असे आमंत्रण त्यांनी दिले.ते आज गोव्यात पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या  52 व्या इफ्फी आवृत्तीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

 

‘‘भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी आपल्या देशातल्या ‘सहयोगी वैविध्‍यतेला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे.’’

प्रथमच, प्रमुख ओटीटी मंच  भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत  आणि त्याबद्दल  प्रचंड आनंद आहे असे   अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, “मला हे सांगताना आनंद होत आहे की, प्रथमच इफ्फीने ओटीटी मंचांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.” महामारीने  ‘सामान्य’ काय आहे याबद्दलची आपली  धारणा बदलली आहे.“कोरोना विषाणू महामारीपासून वाढीस लागेलेले  सिनेमा-आणि-ओटीटी हे मिश्रण दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे आणि हे असे मिश्रण आहे जे केवळ भारतातच नव्हे तर हॉलीवूडमध्ये आणि इतरत्रही उदयाला आले  आहे  असे सांगत ठाकूर म्हणाले की नजीकच्या भविष्यात ते कायम राहण्याची शक्यता आहे.” किंबहुना ही परिस्थिती फायदेशीर असल्याचे सांगत महामारीच्या काळात  “ओटीटी तंत्रज्ञानाशिवाय, चित्रपट उद्योगातील सर्जनशील प्रतिभा दडपली गेली असती आणि चित्रपट उद्योगाची बाजारपेठ ठप्प झाली असती.” याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.

 52 व्या इफ्फी

यंदाच्या इफ्फिमधील अभिनव उपक्रमासंदर्भात बोलताना, ठाकूर यांनी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ (उद्याची 75 सर्जनशील मने )  – या स्पर्धेचा उल्लेख केला,देशातील तरुण सर्जनशील मन आणि नवोदित कलागुणांना  प्रोत्साहन देणे आणि ओळखणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.”भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात,’स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव’ निमित्त “75 यंग क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो”  या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून युवा प्रतिभेला ओळखून  मार्गदर्शन केले जाणार आहे. चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्यूरीने निवड केलेल्या  75 सर्जनशील मनांचे , तरुण सर्जनशील कलाकारांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले.

आणखी वाचा :सहाय्यक पोलीस निरीक्षकाने विचारला न्यायधीशांना जाब?

” 52 व्या इफ्फी  बरोबर  प्रथमच  ब्रीक्स चित्रपट महोत्सवाद्वारे 5 ब्रीक्स राष्ट्रे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहेत, असे सांगत यावर्षी इफ्फिमध्ये  काही अनोख्या उपक्रमांची भर पडली आहे , असे ठाकूर  म्हणाले.

या संदर्भात पुढे बोलताना श्री ठाकूर म्हणाले की, “चित्रपटातील उत्कृष्टतेसाठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार  यंदापासून दरवर्षी इफ्फीमध्ये प्रदान केला जाईल जो सत्यजित रे यांच्या समृद्ध  वारशाच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू होत आहे.

 52 व्या इफ्फी त हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती  हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021, हा पुरस्कार अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते  प्रदान केला.  प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष श्री प्रसून जोशी हे या पुरस्काराचे  दुसरे मानकरी असून त्यांना     इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.

 

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार

आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान साबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारही श्री ठाकूर यांनी प्रदान केला. मेफिस्टो (1981) फादर (1966) यांसारख्या  उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले  गेलेले, गेल्या काही दशकांतील सर्व समीक्षकांकडून प्रशंसित असलेले इस्तेवन स्झाबो हे हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मार्टिन स्कॉरसेस हे नव्या हॉलीवूड युगातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

पहिला ब्रिक्स चित्रपट महोत्सव

प्रथमच, पाच ब्रिक्स राष्ट्रांचे चित्रपट इफ्फीसोबत ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या  माध्यमातून दाखवले जातील. ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत हे पाच देश 52 व्या IFFI चे फोकस देश आहेत. कंट्री ऑफ फोकस हा एक विशेष विभाग आहे जो त्या विशिष्टदेशाची चित्रपट संबंधी उत्कृष्टता आणि योगदान यांचा सन्मान करतो.

 

 52 व्या इफ्फी त प्रमुख ओटीटी मंचाचा यंदा सहभाग   

52 व्या इफ्फी च्या  इतिहासात प्रथमच,  नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, झी 5, वूट  सोनी लाईव्ह , व्हायकॉम हे प्रमुख ओटीटी  प्लॅटफॉर्म यात सहभागी होत आहेत. मास्टर क्लासेस, कंटेंट लॉन्च आणि प्रिव्हू , क्युरेटेड फिल्म पॅकेज स्क्रीनिंग आणि इतर विविध कार्यक्रमात सहभागी होतील. ओटीटीवर चित्रपट  पाहण्याचा कल वाढत असताना, इफ्फी  नवीन तंत्रज्ञान स्वीकारत   आहे आणि या उद्योगातील कलाकारांना ओटीटी कंपन्यांशी संवाद   साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

 

52 व्या इफ्फी साठी आलेले प्रतिनिधी आणि पाहुण्यांचे स्वागत करतांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवंगत डॉ मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पर्रीकर मुख्यमंत्री असतांना पहिल्यांदाच ईफ्फीचे यजमानपद गोव्याला मिळाले होते. त्यानंतर, सलग 17 वर्षे  इफ्फी या समुद्रकिनारी असलेल्या पणजी शहरात साजरा होतो आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट  साध्य करण्याच्या प्रयत्नांत, केंद्र सरकाच्या समर्थनाने चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात, आत्मनिर्भर होण्याचे गोव्याचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles