कोरोना बधितांची संख्या शतकाच्या पुढे;१४५ रूग्णांना डिस्चार्ज
११४ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर दि 17 फेब्रुवारी, प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात रूग्ण संख्येत ११४ ने वाढ झाली आहे.ही संख्या शतकाने वाढल्याने पुन्हा कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे.
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८२१ इतकी झाली आहे.
आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ९३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३७ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८४ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, नेवासा ०१, पारनेर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १३, पारनेर ०३, पाथर्डी ०१,राहाता १९ राहुरी ०१, संगमनेर २०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आणखी वाचा:अडीच लाखांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात
अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०८, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०३, राहुरी ०४, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(१४५)
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३०, अकोले ०४, जामखेड ०८, कर्जत ०५, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १५, नेवासा ०८, पारनेर ०८, पाथर्डी ०५, राहाता ११, राहुरी ०६, संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:७१९३९*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ८२१*
*मृत्यू:१११९*
*एकूण रूग्ण संख्या:७३८७९*