- Advertisement -
- Advertisement -
सुरक्षकाच्या बंदुकीतील गोळी अचानक सुटून लागल्याने एका ग्राहकाचा मृत्यू
अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अशोक बँकेच्या सुरक्षकाकडून बंदुकीतील गोळी अचानक सुटून लागल्याने एका ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला.अजित जोशी हे मृत ग्राहकाचे नाव आहे.
अशोक सहकारी बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी हे त्यांच्या बँकेचा रोख भरणा करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांसोबत आले होते. कर्मचारी आत भरणा करण्यासाठी गेले असता सुरक्षा रक्षक पुजारी जिल्हा बँकेच्या ए. टी. एम. जवळ थांबले असता त्यांच्या बंदुकीतुन अचानक गोळी सुटून ती जोशी यांच्या डोक्यात शिरुन त्यांचे जागीच निधन झाले.