समाजसेवा करणाऱ्या शिक्षकाला मारहाण ,

- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर(विशेष प्रतिनिधी )

समाजसेवा करणाऱ्या शिक्षकावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण,जीवे मारण्याची  धमकी

तालुक्यातील कोतुळ येथील शिक्षक पती पत्नीस राष्ट्रवादी काँग्रेस चा उपाध्यक्ष   बबलू सोमनाथ देशमुख  दमबाजी करून   त्यांच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली  याबाबत अकोले पोलिसांकडे स्वाती बाळासाहेब शिंदे रा. कोतुळ यांनी फिर्याद दिली असून अकोले पोलिसांनी फिर्याद दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे . याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, २४ मे रोजी फिर्यादी चे घरी रात्री साडेदहा वाजता आरोपी  बबलू सोमनाथ देशमुख , प्रशांत किसान देशमुख , नितीन रामनाथ देशमुख रा . कोतुळ .हे फिर्यादीच्या घरासमोर आले यावेळी त्याचे पती बाळासाहेब बन्सी शिंदे व मुलगी श्रावणी हे घरी असताना आरोपी यांनी  विनाकारण शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादी महिलेने व त्याच्या पटीने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी नितीन देशमुख , बबलू देशमुख यांनी बाळासाहेब शिंदे यांची गच्ची पकडून गालात मारली त्यावेळी फिर्यादी सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण झाली तुम्ही कसे येथे राहतात तुम्हाला एक एकाला जिवंत मारून टाकू अशी ठार करण्याची धमकी दिल्यावरून त्याच्या विरोधात अकोले पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी दि.25 रोजी राष्ट्रवादीचे  तालुका उपाध्यक्ष  बबलू सोमनाथ देशमुख याने शिक्षक शिंदे यांना चौकात दमबाजी केली यानंतर स्वाती बाळासाहेब शिंदे यांनी प्रशांत देशमुख ,नितीन देशमुख यांच्या सह 3 जणांवर अकोले पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार नोंदविण्यात आली असून IPC कलम ३२३ ,५०४ ,५०६  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर तपास  एपीआय  मिथुन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गोराने करत आहे . शिक्षक असलेले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे  संपूर्ण अकोले तालुक्यात गावोगावी जाऊन  कोरोना संदर्भात जनजागृती करून गावोगावी सॅनिटायझर वाटत आहे,सॅनिटायझर  मॅन म्हणून त्यांचा गौरव झाला असून स्वखर्चाने ही सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. 

तालुक्यातील कोतुळ येथील शिक्षक पती पत्नीस राष्ट्रवादी काँग्रेस चा उपाध्यक्ष असलेला  बबलू सोमनाथ देशमुख  दमबाजी करून   त्यांच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली . 

शिक्षक असलेले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे हे संपूर्ण अकोले तालुक्यात गावोगावी जाऊन  कोरोना संदर्भात जनजागृती करून गावोगावी सॅनिटायझर वाटत आहे,सॅनिटायझर  मॅन म्हणून त्यांचा गौरव झाला असून स्वखर्चाने ही सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. 

बाळासाहेब शिंदे यांची आमदार निलेश लंके यांनी कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला होता त्यांनी सत्कार केल्याचे फोटो मित्र परिवार या व्हाट्सअप  ग्रुप वर टाकले असता  कोतुळ गावातील

प्रशांत देशमुख याने अश्लील शब्दात टीका टिपण्णी केली.दि.24/05/2021

रोजी रात्री 10.30 या वेळेत. 

प्रशांत देशमुख,नितीन देशमुख इतर 5/6 जण लाकडी दांडके लोखंडी रॉड घेऊन शिंदे यांच्या घरी जाऊन 

तू सत्कार आमदार लंके यांच्याकडून करून घेतो आणि आमच्या गावात राजकारण करतो,बॅनर बाजी करतो अस म्हणत मारहाण केली यावेळी त्यांची पत्नीमध्ये सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. 

   दुसऱ्या दिवशी दि.25 रोजी राष्ट्रवादीचे  तालुका उपाध्यक्ष  बबलू सोमनाथ देशमुख याने शिक्षक शिंदे यांना चौकात दमबाजी केली यानंतर स्वाती बाळासाहेब शिंदे यांनी प्रशांत देशमुख ,नितीन देशमुख यांच्या सह 3 जणांवर अकोले पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार नोंदविण्यात आली असून IPC कलम 323,504,506 गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर तपास पोलिस नाईक गोराने यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles