- Advertisement -
- Advertisement -
अकोले (विशेष प्रतिनिधी ) –
अकोले येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला व दंडेली करून कामकाजात अडथळा आणला. विशेष म्हणजे तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या समोर त्यांचा कार्यकर्ता असे कृत्य करतो,याचा बोलविता धनी आ.डॉ.किरण लहामटे हेच आहे.असा आरोप करीत हे महाआघाडीच्या तत्वाला व व्यवहाराला घा तक कृत्य त्यांनी केले.या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष चा राजीनामा घेऊन त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ने कारवाई करावी , व त्यांनी माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर कोणत्याच पातळीवर काम करणार नाही असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी दिला.
अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे अयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते मधुकरराव नवले,मिनानाथ पांडे,बाळासाहेब नाईकवाडी, रमेशराव जगताप,चंद्रभान निरगुडे,शंकरराव वाळुंज,अरीफभाई तांबोळी,शिवाजी नेहे,संपतराव कानवडे, मंदाबाई नवले,विक्रम नवले,रामदास धुमाळ,साईनाथ नवले,उबेद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नेते मधुकरराव नवले म्हणाले की,महसूलमंत्री ना.थोरात यांच्या बैठकीत जाणून बुजून गोंधळ घालून मिटिंग हाणून पाडण्याचा डाव होता.व त्याचे समर्थन डाव्या विचारसरणीच्या नेत्याने करावे ही आश्चर्याची बाब आहे.तालुक्यात कोणी एकटा आंदोलन करीत नाही याचा मागे जाऊन इतिहास तपासावा. कोरोनाच्या गंभीर परिस्थिती आमदार महोदयांनी पालक मंत्री,आरोग्य मंत्री,उपमुख्यमंत्री यांचे कडे जाणे गरजेचे असताना शुल्लक आंदोलनात गुंतून ठेवून भोळ्या आमदारांचा फायदा कोण घेते याचा विचार खुद्द आमदारांनी करावा. रेमडीसीविर वितरण व्यवस्थित केले नाही म्हणून राज्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविले मग याला महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात जबाबदार कसे? असा सवाल करीत ना.थोरात साहेब यांनी अकोले संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही,त्यांनी तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहे.हे अकोल्याची विसरली नाही.दुही निर्माण करणे दोन्ही तालुक्याला परवडणारे नाही.आढावा बैठक झाल्यानंतर प्रशासनाने अजून वेग घेऊन सज्ज झाले असल्याचे दिसत आहे.आंदोलन हे निर्मळ मनाने,समाजाभिमुख असावे,व्यक्तिद्वेष ठेवून आंदोलन करू नये.काँग्रेस पक्षाचे आ.लहामटे यांना आमदार करण्यात मोठा वाटा आहे हे विसरू नये.काँग्रेस पक्षाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मागील वर्षी उत्कृष्ट कोरोनटाईन सेंटर अभिनवच्या माध्यमातून चालविले,पतसंस्थांच्या माध्यमातून योगदान दिले.यावर्षी प्रशासनाच्या सुचनेनुसार बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपये निधी खर्च करणार असल्याचे श्री.नवले यांनी सांगितले व तसे प्रशासनाला कळविलेआहे. आपणच एकटे आंदोलन करतो या आविर्भावात कोणी अहंकार ठेवून सांगू नये, तालुक्यातील सर्व पक्षाने व नेत्यांनी आंदोलने करून तालुक्याला खूप काही मिळवून दिले आहे.हा त्या सर्व आंदोलकांचा अवमान असल्याचे म्हणाले.यावर्षी युवक काँग्रेसने औषधे वाटपाचा एक टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा आज सुरू केला आहे.25 ऑक्सिजन सिलेंडर मिळवून दिली आहेत. अजूनही काही बेड,गाद्या व इतर मदत आवश्यक असल्यास तेही देणार असल्याचे सांगितले.ना.थोरात साहेब हे राज्याचे,देशाचे नेते आहेत,त्यांचा अवमान अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही सहन करणार नाही.त्यांचे 40 वर्षातील योगदान मोठे आहे.हे आरोप करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. तुम्ही केंद्र सरकारला जाब विचारणे गरजेचे असताना स्वतःला महाआघाडीत असल्याचे सांगून घटक पक्षावर आरोप करतात,हे कितपत योग्य आहे. अशी टीका डॉ. अजित नवले यांचे नाव न घेता केली.आमदार लहामटे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावे,मित्र पक्ष म्हणविता आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाला डावलण्याचा प्रयत्न करता ही बाब योग्य नाही ,अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा मधुकरराव नवले यांनी दिला.
यावेळी जेष्ठ नेते मिनानाथ पांडे म्हणाले की, जेव्हा मंत्री महोदय तालुक्यात येतात त्यावेळी त्यांचे स्वागत आमदार यांनी करणे गरजेचे आहे हा प्रोटोकॉल आहे.तुम्हाला मिटिंग चे माहीत असताना तुम्ही उशिरा का आले? राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, सेना मनसे व भाजप चे प्रतिनिधी हजर होते.राज्यात महाआघाडी सरकार बनविण्यात ना.बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे.नव्हेतर सरकारच काँग्रेस मुळे आहे. हे लक्षात घ्यावे.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील एकदरे येथे एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये कोव्हीड सेंटर सुरू होणार आहे,त्याचा फायदा आदिवासी भागातील जनतेला होणार आहे.घोटी येथील एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये अकोलेच्या कोरोना रुग्ण उपचार घेत आहे.संगमनेर येथे अकोले तालुक्यातील रुग्ण उपचार घेत आहे.मग दुजाभाव कसा होऊ शकतो.पारनेर चे आमदार निलेश लंके राज्य पातळी वर मंत्री महोदय यांचे कडे पाठपुरावा करून कोरोना ग्रस्तांसाठी चांगले काम करू शकतात मग तुम्हाला हे काम जमत नाही? तुम्ही वरच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे सोडून इथे किरकोळ आंदोलन कशाला करता,आरोग्य व्यवस्था उभी करणे हे आमदारांचे काम आहे,तुम्ही पालकमंत्री यांच्या मिटींगला का गेले नाही, आरोग्य मंत्री टोपे, राजेंद्र हिंगणे यांना फोन करून प्रश्न का मांडले नाही? असा सवाल आ.लहामटे यांना श्री. पांडे यांनी केला.तुम्ही म्हणता 40 वर्षात काही झाले नाही,मग आता तुमचे हात कोणी धरले? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आरोग्य व्यवस्था उभी करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका केली. तालुक्यातील महत्वाच्या कोरोनाआढावा बैठकीला डॉ.नवले यांना तहसीलदार यांनी निरोप दिला होता मग त्यांनी येणे गरजेचे होते.ते का आले नाही हे समजले नाही.तालुक्यातील प्रशासन भवन,देवठाण रोड, निळवंडे कालवे,अकोले 32 गाव पाणीपुरवठा ही कामे ना.थोरात यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत.असे श्री पांडे यांनी सांगितले. चौकट — आमदार किरण लहामटे हे अधिकारी यांना फोन करून रेकोर्डिंग व्हायरल करतात त्यामुळे तालुक्यात अधिकारी काम करण्यास धजावत नाही त्यापेक्षा संबधित मंत्र्याकडे जाऊन तालुक्याचे प्रश्न सोडवावे आदोलन करणे हे काम सत्तधारी नव्हे तर विरोधकांचे आहे . हे ध्यानात घ्या आमदार साहेब
युवक काँग्रेसचे नेते अरीफभाई तांबोळी यांनी राज्याचे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.
शेवटी आभार शिवाजी नेहे यांनी मानले.
obc scholarship,मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूर