विदर्भ साहित्यिका कल्पना शिंदे यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
-मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे वितरण सोहळा संपन्न-
शिरूर
विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिका कल्पना शिंदे यांना साहित्य गौरव पुरस्काराने औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले आहे.शब्दगंध समूह प्रकाशन,औरंगाबाद आणि आम्रपाली प्रकाशन,बीड तसेच ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम दि.9 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी दोन वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटरच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रुपाली पवार यांच्या हस्ते झाले.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक,मुंबई शाखेचे निवृत्त व्यवस्थापक अरुण घोडेराव यांच्यासह कवी व पर्यावरण मित्र सुमित राठोड यांची उपस्थिती होती.शब्दगंध समूह प्रकाशनचे संदीप त्रिभुवन आणि आम्रपाली प्रकाशनचे लखन काशीकर यांनी या कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन केले होते.या वेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा देखील विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिका कल्पना शिंदे यांना 2022 चा साहित्य गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिंदे यांना या पूर्वी जागतिक आंबेडकर साहित्य मंडळाच्या वतीने दया पवार यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार तसेच गुजरात राज्यात भाग्योदय मंचाच्या वतीने साहित्य भूषण आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाच्या वतीने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यातील मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.