राम रुपी वैभव भाऊची सेवा करणारा हनुमंत रुपी रमेश
अकोले ,(प्रतिनिधी )
राजकारणात माणसे धरसोड करतात
आजचा कार्यकर्ता उद्या दुसरीकडेच पाणी भरताना दिसतो,तसेच
व्यवसाय नोकरीत असेच काहीशे चित्र पाहायला मिळते .एकनिष्ठ
रामभक्त होणे आजच्या युगात कठीण काम आहे .त्याचे कारण
दोघांनी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक असते हे ज्याला
जमले तो यशस्वी होतो. मात्र असाच एक रामभक्त हनुमान रमेश
पुंडे गेली दोन तप राम रुपी वैभव भाऊ पिचड यांचेकडे
चक्रधरांच्या माध्यमातून काम करत आहे .त्याच्या इतका विश्वासू
एकनिष्ठ सध्याच्या कलियुगात दुरापास्त आहे. वैभव भाऊ सोबत
त्यांचे कौटुंबिक संबंध त्यांनी निर्माण केले आहेत .मित भाषिक
रमेश पुंडे पिचड कुटुंबीयांना जीवापाड जपतो कधी चालक कधी
अंगरक्षक तर कधी कुटुंबातील घटक ,अश्या विविध भूमिका
बजवणारा हा अवलिया तालुक्यात,राज्यात,देशात वैभव भाऊ
पिचड कुठे ही जावो त्यांची साथ कधीच सोडत नाही. नेता कसा
असावा मालक कसा असावा भाऊ कसा असावा मित्र कसा
असावा तर वैभव भाऊ सारखा असा रमेश पुंड छातीठोकपणे
सांगतात .त्यांच्या कामाचे कौतुक कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते
,पत्रकार सतत करत असतात सत्ता असो अगर नसो मात्र माझे
दैवत वैभव भाऊच असे हनुमान रुपी रमेश नेहमी सांगत असतो
.मात्र त्याच्या या योगदानाबद्दल वैभव भाऊही भरभरून बोलतात
रमेश माझ्या कुटुंबातील एक घटकच आहे माझ्या सुख दुःखात
उन, वांरा,पाऊस,असो बाराही महिने माझ्या सोबतीला तो
असतोच .त्याच्या कामाचे मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही
असे वैभव भाऊ म्हणतात.असा या अवलिया हनुमान रुपी रमेश
भाऊ पुंड यांचा आज वाढदिवस त्यांना आजच्या दिवशी तमाम
तालुक्यातील जनतेच्या तसेच मित्र,हितचिंतक यांच्यावतीने हार्दिक
शुभेछ्या.त्यांनी घेतलेला वसा असाच पुढे चालत राहो ही
ईश्वरचरणी प्रार्थना .टीमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे व
भरभराटीचे जावो.ही ईश्वरचरणी प्रार्थना…. शांताराम काळे ,