पुर्णाहुती महापूजेने श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता

- Advertisement -
- Advertisement -

 

एम एम कुलकर्णी

अंबाजोगाई

मार्गशीर्ष महोत्सव I महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी सकाळी १० वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा झाली.

महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली.

अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. यावेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील,सचिव अँड शरद लोमटे,उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडीया, मंदिराचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, विश्वस्त भगवानराव शिंदे,राजकिशोर मोदी,अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ.संध्या जाधव, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह देवीचे पुरोहित, मानकरी व भक्त उपस्थित होते.

या पुर्णाहुतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला.
——-
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजारांपेक्षा ज्यास्त महिला आराध बसल्या होत्या.
———————–
अंबाजोगाई देवी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी-:
आज मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री.योगेश्वरी देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवीच्या दर्शनासाठी झालेली गर्दी तर यात्रे निमित्त विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.सर्वच ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
———————-
आराध्यांच्या मेळ्याने वातावरण भक्तिमय-:
अंबाजोगाई योगेश्वरी देवी च्या मार्गशीर्ष महोत्सवात महिला व भाविक सलग नऊ दिवस मंदिर परिसरात आराध बसतात.ही आराधी मंडळी मोठ्या भक्तिभावाने देवीचे गाणे गाऊन व आपल्या जवळील झांज,संबळ,हलकी,वाजवून आराधना करतात.या आराध्यांच्या मेळाव्याने मंदिर परिसर भक्तिमय होऊन जातो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles