- Advertisement -
- Advertisement -
अकोले, ता.१: गेली चाळीस वर्षे विकास कामे करताना अनेक संघर्ष करावे लागले मात्र तालुक्याच्या जनतेने साथ दिली त्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आज माझ्या अंशी वर्षात जनतेचे तुसभर प्रेम कमी झाले नाही त्यामुळे आज आपण मला शुभेछ्या देण्यासाठी आलात मीआपल्या भावना समजू शकतो मात्र कोरोणा काळात काळजी घ्या आपले कुटुंब ,आपले गाव कोरोना मुक्त होण्यासाठी सतर्क रहा असे आवाहन करतानाच तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने ,सरपंच,महसूल,पोलिस यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले.आज ८० वा वाढदिवसानिमित्त राजूर येथे रक्तदान शिबिर,कोव्हिड योद्ध यांचा वृक्ष,मास्क,वाफेचे मशीन,प्रशस्ती पत्रक,शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड, आदिवासी उन्नतीचे सचिव मंगलदास भवारी, काशिनाथ साबळे,पंचायत समिती सभापती सौ.उर्मिला राऊत, उपसभापतीदत्ता देशमुख,उद्योजक नितीन गोडसे,कैलास वाकचौरे,मुरली अण्णा भांगरेशंभू नेहे,सरपंच गणपत देशमुख,संतोष बनसोडे,गोकुळ कान काटे डॉ .मारुती भांडकुली,डॉ.तानाजी लेंडे,डॉ . शेटे ,डॉ. दिघे,डॉ.बाबसाहेब गोडगे,प्राचार्या सौ.मंजुषा काळे,अशोक देशमुख,राजेंद्र कान काटे, आयुब तांबोळी, पेसां ग्रामपंचायतचे चंद्रकांत गोंद के,पांडुरंग खाडे,आदिवासी विकास परिषदेचे विजय भांगरे,विजय लहमगे,जेष्ठ पत्रकार शांताराम काळे उपस्थित होते .प्रसंगी बोलताना माजी मंत्री पिचड म्हणले जगात व देशात कोरोना गतीने वाढत आहे .त्यासाठी काळजी घ्या .मी लस घेतली तुम्ही लस घ्या,लग्न कार्यात मंडप घालू नका गर्दी वाढवू नका,गर्दी मुळे संक्रमण वाढेल व आपल्या कुटुंबाला भविष्यात त्याचा त्रास होईल ,पथ्य पाळा,डॉकटर चया सल्ल्याने औषधे घ्या,चुकीचे औषधे घेऊन जीव गमवू नका,आपल्या आदिवासी भागात बंगाली डॉकटर फिरतात त्यांचेकडे लक्ष्य ठेवा,आरोग्य विभागाने पोलिस कारवाई करण्याचे धाडस दाखवावे.तालुक्यात अकोले,राजूर, संमशेरपुर,ब्रहामन वाडा, कळस, कोतू ल या ठिकाणी लोकसहभागातून कोरोना काळजी केंद्र सुरू आहेत.अतिशय चांगले काम सुरू असून या कामाची सरकारने दखल घेतली आहे .वैभव पिचड सातत्याने पाठपुरावा करत असून त्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती दहा दिवस होम कोरानटाईन त्याला राहावे लागले.डॉ.भंडकुळी यांनाही उपचार करताना कोरोना झाला मात्र त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली .प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेऊन मार्गक्रमण करावे .आयुष्याच्या उतरणीला जात असताना जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले त्यामुळे समाजाच्या हिताचे निर्णय घेता आले.आदिवासी समाजावरील अन्याय दूर करता आले आदिवासी व धनगर याबाबत संघ र्ष करताना राज्यातील आदिवासी आमदारांनी साथ दिली .माझे आयुष्य किती आहे मला माहित नाही मात्र जीवात जीव असे पर्यंत तुमच्यासाठी तालुक्याच्या हिता साठी हाकेच्या अंतरावर असेल असे भावूक उदगार प्रसंगी काढले .सुत्रसंचलन भास्कर एलमामे तर आभार संतोष बनसोडे यांनी मानले.
bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक