महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी मतदान केले.
राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले.
तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजता वंदे मातरम् ने विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली.
pm modi dehu पंतप्रधानांनी पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले