- Advertisement -
- Advertisement -
मराठवाडा शिक्षक संघाच्या नवीन केंद्र कार्यकारिणीची निवड.
बीड
मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून नांदेडचे सूर्यकांत विश्वासराव तर सरचिटणीस म्हणून बीडचे राजकुमार कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भयमुक्त शिक्षण व भ्रष्टाचार मुक्त गुणात्मक शिक्षण, कर्तव्याचे अनुपालन व हक्कासाठी संघर्ष करून कार्यरत असणाऱ्या मराठवाडा शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा काल दि. 10 एप्रिल 2022 रोजी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय पी. एस. घाडगे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ही सर्वसाधारण सभा संघटनेचे पदाधिकारी स्व. भा.वा. सानप सरांच्या भगवान विद्यालय बीड या शाळेत संपन्न झाली…सर्वप्रथम कोरोना काळात दिवंगत झालेल्या मराठवाडाशिक्षक संघाच्या सदस्यांना व त्यांच्या निकटवर्तीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेत कार्यकाळ संपल्याने कार्यकारणी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा शिक्षकसंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष पद अत्यंत यशस्वीपणे भूषवून प्रभावशाली कार्य केलेले श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हळदा येथिल मुख्याध्यापक सूर्यकांत विश्वासराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून एस. जी. गुट्टे, जी. डी. पोले,(परभणी) डी.एस. वरवटे तर कोषाध्यक्ष म्हणून ए. बी. औताडे(उस्मानाबाद)
संघाचे सरचिटणीस म्हणून राजकुमार कदम(बीड) सहसचिव टी. जी. पवार , एन. जी. माळी , तर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून ई. डी. पाटोदेकर. आर. एन. सूर्यवंशी ( परभणी) विक्रम गंगाधर कदम प्रेमदास रामधन राठोड, ए. ए.कुरेशी, एन. टी. सोळंके. बी.ए. वराड, ए.व्ही. मस्कले, बी. बी.आघाव, गोविंद कौसल्ये, तर महिला प्रतिनिधी म्हणून सौ रेखा सोळंके नांदेड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठवाडा शिक्षक संघाची स्थापना 1965-66 ची
असून शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर संघाने धोरणात्मक लढे देऊन आतापर्यंत यश मिळवले असून शिक्षक संघाने हक्काचे अनेक आमदार निवडून दिले आहेत. संघाच्या आमदारांनी शिक्षकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने करून शिक्षकांना सेवाशाश्वती पासून सेवानिवृत्ती पर्यंतचे लाभ मिळवून देत अनेक प्रश्न सोडविल्याचा इतिहास मराठवाडा शिक्षकसंघाच्या नावावर आहे.
यावेळी संपूर्ण मराठवाड्यातून अनेक जिल्हा प्रतिनिधी व शिक्षक संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..लवकरच नूतन जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी व नवीन सभासद नोंदणी करुन संघाची सभासद संख्या वाढवुन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार यावेळी एक शिक्षकसंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी नव्या जुन्याचा मेळ घालण्यासाठी संघटनेचे मावळते अध्यक्ष पी.एस. घाडगे, सरचिटणीस व्ही जी पवार आणि जे.एम.सय्यद यांचे मार्गदर्शक मंडळ निवडण्यात आले. येऊ घातलेल्या औरंगाबाद विभाग शिक्षकमतदार संघाचा मराठवाडा शिक्षकसंघाचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यासाठी पी. एस.घाडगे, व्ही. जी.पवार आणि सांगळे बी.टी. यांची निवडसमिती निवडण्यात आली. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या नुतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
भगवान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गो.गो.मिसाळ सर यांनी सर्वसाधारण सभेसाठी विद्यालय उपलब्ध करून दिले तर शाळेचे मुख्याध्यापक अशोक मिसाळ, उपमुख्याध्यापक वासुदेव येवले, पर्यवेक्षक एस.एम. बडे यांनी चोख व्यवस्था केली.
बीड मराठवाडा शिक्षक संघाचे कालिदास धपाटे, गणेश आजबे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, सुनिल नागरगोजे, मधुकर चौरे, पुरुषोत्तम येडे पाटील, शारेख बेग, घोडके एस.जे, नदीम सर, परवेझ कादरी, विश्वनाथ जाधव, प्रभाकर उंबरे, रमाकांत शेळके यांनी सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.