बहिरी ससाणा: दुर्मिळ पक्ष्याचे पिल्लू आढळले

akl12p1

अकोले,ता.११: 

बहिरी ससाणा,तालुक्याच्या उत्तर भागातील पट्टा किल्ला परिसरात.त्या परिसरात असणाऱ्या पवनचक्कीच्या विजेच्या तारांना  जखमी अवस्थेत ते आढळून आलें.

वनखात्याच्या सहकार्याने त्यांचेवर खिरविरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले .

मात्र या पिल्लाची जखम गँभीर असल्यामुळे त्याला गरज भासल्यास अधिक उपचारासाठी पुणे अथवा मुंबई येथे नेण्याचा विचार असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य रोहिदास डगळे यांनी सांगितले .

  अकोले तालुक्यातील या पक्ष्याची  बहुदा ही पहिलीच नोंद असावी.

बहिरी ससाणा हा पक्षी भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत अनुसूची 1 मधील संकटग्रस्त पक्षि असून याला वाघा येवढेच या कायद्या अंतर्गत संरक्षण असल्याची माहिती श्री डगळे यांनी दिली .

बहिरी ससाणा *Peregrine falcon* (शास्त्रीय नावः _Falco peregrinus_ )

हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.

ज्या अर्थी हे पिल्लु सापडले त्या अर्थी  या भागात त्याचे अस्तित्व असावे. 

 गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे.

डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले यांवरून हा पक्षी ओळखता येतो.बहिरी हे मूळचे नाव अरबी असून अरबी भाषेत बहारी असे म्हणतात.

इंग्रजीत हा पेरेग्रीन फाल्कन या नावाने ओळखला जातो. आखाती देशात याला माणसाळवून शिकारीसाठी वापरतात.

एकेकाळी हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला होता.

परंतु ७० ते ८० च्या दशकात या पक्ष्याच्या संख्येने पुन्हा उचल घेतली आहे.

दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर होता. 

या पक्ष्याचे डोळे मानवापेक्षा 8 पट अधिक क्षमतेने पाहू शकतात त्यामुळे  तो 3 किलोमीटर वरून भक्ष्याला पाहू शकतो.

आपल्या तीक्ष्ण नख्यांच्या सहाय्याने तो शिकार करतो. परंतु आकारापेक्षा मोठी शिकार असल्यास तिला हवेत सोडून देतो. 

बहिरी ससाणा पक्षाची  मादी साधारण 3-4 अंडी देते, या पक्ष्यांचे जीवनमान 19 वर्षा पर्यन्त असते.

छायाचित्रकार  रवींद्र डगळे याना हा पक्षी जखमी अवस्टेत वीज वाहकवतारांवर आढळून आला.

या परिसरात मोठ्या प्रमाणात पवन चक्या आहेत .या चक्या आणि त्यांच्या विजवाहक तारा या मुळे अनेक पक्षी अश्या प्रकारे जखमी होत असतात असे निसर्ग प्रेमींचे म्हणणे आहे.

उपचारानंतर या पक्षाला जेथे सापडला त्या परिसरात सोडण्यात येणार होते .मात्र जखम गँभीत असल्यामुळे अधिक चांगल्या उपचाराची गरज असल्याचे श्री डगळे यांनी सांगितले.

दुपारी बाहिरी ससाणा उपचारासाठी नशिक चे मानद वन्यजीव रक्षक श्री. वैभव भोगले यांच्याकडे उपचार करण्यासाठी सुपूर्द केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles