शिक्षकांना हिटलरप्रमाणे वागणूक देणा-या प्रशांत बंब यांचा  मराठवाडा शिक्षक संघा कडून तीव्र निषेध

- Advertisement -
- Advertisement -

शिक्षकांना हिटलरप्रमाणे वागणूक देणा-या बंब यांचा  मराठवाडा शिक्षक संघा कडून तीव्र निषेध

बीड,

सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात आमदार प्रशांत बंब यांचे  विधिमंडळातील वक्तव्य शिक्षकांना वेठबिगार समजणारे असून शिक्षकांना हिटलरप्रमाणे वागणूक देणा-या आमदार महोदयांचा मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय  अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी तीव्र निषेध केला आहे.
आमदार प्रशांत बंब यांचे विधानसभेतील शिक्षकांचे वक्तव्य अतिशय हीन दर्जाचे शिक्षक वर्गाचा अपमान करणारे असल्याने तमाम शिक्षक वर्गाच्या भावना दुखावणारे आहे.  शासक वर्गाच्या चुकीच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या दुष्परिणामांना शिक्षकांना जबाबदार धरण्याचा आमदार महोदयांचा तो केविलवाणा प्रयत्न होता. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण महाग होत चालले आहे,  सर्वसामान्यांचा आवाक्याच्या बाहेर चालले आहे यावर हे महाशय चकार शब्द बोलत नाहीत.  गावातील नागरिकांनाच रहायला घरे नाहीत तर शिक्षकांना कुठून मिळतील घरे म्हणून शिक्षक जीव मुठीत घेऊन अपडाऊन करतात या परिस्थितीकडे आमदार महोदय दूर्लक्ष करतात. शाळेच्या परिसरात शिक्षकांना किमान सुविधा असलेली निवासस्थाने उपलब्ध करून देण्या बाबत बंब आग्रह धरत नाहीत! हजारो शिक्षक वीस बावीस वर्षां पासून विनावेतन काम करत आहेत हे शिक्षक आपला उदरनिर्वाह कसा भागवत असतील, शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना आणि शिक्षकांना कितीतरी शाळाबाह्य कामे लावताना त्याचे शिक्षणावर काय परिणाम होत आहेत याची माहिती घेऊन त्याचा जाब या महाशयांनी सरकारला विचारला असता तर शिक्षणा बद्दल यांना काही कणव आहे असे वाटले असते. कोठारी आयोगाने सूचवल्या प्रमाणे सर्वांसाठी एकच शाळा या सूचनेची अंमलबजावणी का झाली नाही! स्वयं अर्थसहाय्यित शाळा,  कॉन्व्हेंट स्कूल, इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यासाठी परवानगी देऊन विषमतापूर्ण शिक्षणास कुणी चालना दिली आणि यास आळा घालून सर्वांना समान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी काय करता येईल याचाही विचार बंबसाहेबांनी करावे! विधानसभेत आमदार महोदय बोलले त्यांना लिहिने वाचणे शिक्षकांनीच शिकवले याचा विसर आमदार साहेबांना पडला.  शिक्षक चोर आहेत , खोटे बोलतात असे बेलगाम आरोप करणा-या प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम,केंद्र कार्यकारिणी सदस्य अशोक मस्कले,  बंडू आघाव, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे,  जिल्हा सचिव गणेश आजबे, नामदेव काळे,  नागनाथ तोंडारे,  सुभाष शेवाळे, परवेज देशमुख, विजय गणगे,  गुलाबभाई शेख, गोवर्धन सानप,  हनुमंत घाडगे, व्यंकटराव धायगुडे, मनोज सातपुते, डी. एम.तावरे, युवराज मुरूमकर,  विनोद सवासे, आय.जे.शेख, एम. डी. डोळे, दीपक सोळंके, अश्विन गोरे,  अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवन थोरात,  बाळासाहेब टिंगरे,  दादासाहेब घुमरे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड,  विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण,  हेमंत धानोरकर, नदीम युसूफसर, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी,  यांनी तीव्र निषेध केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles