औरंगाबाद, दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग तसेच पदवी महाविद्यालयातील तासिकांना येत्या १५ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. अकरा महिन्यापूर्वी १५ मार्च बंद झालेले वर्ग ‘कोविड‘च्या अटी शर्ती पाळून सुरु होणार आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शासन आदेश जारी करण्यात आला. यानंतर मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ व कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिका-यांची बैठक घेऊन विद्यापीठाने परिपत्रक जारी केले. शैक्षणिक विभागाने जारी केलेलेल्या परिपत्रकानूसार विद्यापीठ विभाग प्रमुख/अध्यापक , विद्यापीठ उपपरिसर संचालक / विभागप्रमुख / अध्यापक व सर्व पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य / व्यवस्थापन / अध्यापक यांना कळविण्यात येते की, आपल्या अधिनिस्त असणारे सर्व शैक्षणिक विभाग व पदवी महाविद्यालये एकुण निर्धारीत प्रवेशक्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थितस अनुमती देण्यात आली आहे. दोन विद्याथ्र्यांमध्ये एका विद्याथ्र्यांची जागा रिक्त सोडून वर्गामध्ये विद्याथ्र्यांनी आळीपाळीने प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे तसेच वेंâद्र शासन व महाराष्ट्र शासनाने साथ रोग कायदा-१८९७/ आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अन्वये विहीत केलेल्या आदेशांचे अनुपालन करण्याच्या अटीवर दि.१५/०२/२०२१ पासून अध्यापकांनी विद्याथ्र्यांना प्रत्यक्षपणे वर्गावर उपस्थित राहून शिकविण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत प्रकरणी, कोव्हिड-१९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती तसेच आरोग्य विषय पायाभूत सुविधांना उपलब्धता या बाबी विचारात घेवून सर्व संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मा.जिल्हा दंडाधिकारी, मा.आयुक्त महानगर पालिका / नगरपालिका किंवा स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची सहमत घेवून महाविद्यालय सुरु करण्यात यावेत. तद्अनुषंगाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी अद्ययावत व्यवस्था, दाने व्यक्तिमध्ये ६ फूट अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, विद्याथ्र्यांना ई-लायब्ररी उपलब्ध करुन देणे, मास्क वापरणे अनिवार्य, बाहयद्वार व अंतरद्वार येथे गर्दी टाळणे तसेच इमारत, वर्ग खोल्या, स्टॉप रुम, ग्रंथालय इत्यादी विभागाचे निरजंतूकीकरण करुन शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आपल्या स्तरावरुन तंतोतंत अनुपालन करणे आवश्यक आहे. कोव्हिड-१९ च्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने विहित केलेल्या अध्यादेशातील तरतूदी नुसार विद्याथ्र्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ७५ ज्ञ् बंधनकारण करण्यात येवू नये व तद्अनुषंगाने विद्याथ्र्यांना उपस्थित राहणेबाबत सक्ती न करता विद्याथ्र्यांची ऑनलाईन / ऑफलाईन / मिश्र पध्दतीची उपस्थिती ग्राहय धरण्यात यावी, तसेच महाविद्यालये व विद्यापीठ विभाग अनेक दिवसापासून बंद आवस्थेत असल्याने तयांचे इलेक्ट्रीक / सेफ्टी ऑडिट स्तरावरुन संबंधीत प्राधिकरणाकडून करुन घेणे अनिवार्य राहील तसेच प्रत्येक विद्याथ्र्यांचा आरोग्य विषयक काळजी घेवून तद्अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्याची जबाबदारी पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा व विभाग प्रमुखाचा राहील. याची कृपया सर्व संबंधितांनी गाभिर्याने नोंद घेण्यात यावी. प्रस्तुत प्रकरणी विद्यापीठाने आदेश दि.२९/१०/२०२१ अन्वये प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशित विद्याथ्र्यांचे अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचना दि.०५/११/२०२० चे आपल्या स्तरावरुन तंतोतंत अनुपालन करुन ऑनलाईन / ऑफलाईन / मिश्र पध्दत / ५० ज्ञ् उपस्थिती आळीपाळी या तत्वानूसार महाविद्यालय व शैक्षणिक विभागांनी वेळापत्रकाचे श्ग्म्rद झ्त्aहहग्हु करुन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करीता निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशीत विद्याथ्र्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात यावेत. प्रस्तुत प्रकरणी कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंदीत क्षेत्रातील अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी विंâवा व इतर घटक यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे बाबत बंदनकारक न करता सर्व संबंधीतांची ऑनलाईन उपस्थिती ग्राहय धरण्यात यावी. तसेच साथ रोग कायदा-१८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ या कायदयाचे उल्लंघन होणार नाही. याबाबत कृपया आपल्या स्तरावरुन दक्षता घेवून तद्अनुषंगाने गांभिर्याने नोंद घेण्यात यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा:आज ७६ रूग्णांना डिस्चार्ज तर १०१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर