अकोले,
ज्येष्ठ पत्रकार व येथील अगस्तीं विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षक ,सांस्कृतीक क्षेत्राची विशेष आवड़ असणारे ,पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष हरिभाऊ खरबस सर वय 45 यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगी,मुलगा,भाऊ,भावजय, पुतणे असा परिवार आहे.
जवळपास गेल्या एक महिन्यापासून संगमनेर येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते.नंतर त्यांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते.
या उपचारा दरम्यान त्यांचे आज रविवारी पहाटे नाशिक येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अकोले तालुक्यावर शोककळा पसरली.
कै. सुभाष खरबस हे हिंदी विषयाचे शिक्षक होते.त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.नाट्य व सिने कलावन्त म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली होती.एन सी सी कॅडेट म्हणून त्यांनी दिल्ली येथे परेडमध्ये त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते.अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सचिव म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविले होते.त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.,
माजी आमदार वैभव पिचड — तालुक्यातील अतिशय अभ्यासू , सामाजिक , राजकीय प्रश्न वेशीवर टांगणारा एक हर हुन्नरी पत्रकार सुभाष खरबस यांच्या निधना चे वृत्त ऐकून मनाला वेदना झाल्या मी घरी असल्याने मला त्या कुटुंबाला भेटता आले नाही तरी मी त्यंच्या दुखात सहभागी असून या कुटुंबाला निश्चित मदत करण्यासाठी लवकरच भेट देऊ ,असे हि वैभव भाऊ पिचड म्हणाले