पंकजा मुंडे कडाडल्या,कार्यकर्त्यांनो तुमच्या बालिश पणाचा त्रास मला होतो, मूर्ख आहेत का?

- Advertisement -
- Advertisement -

 

परळी -प्रतिनिधी

कार्यकर्त्यांची तुफान घोषणबाजी तर घोषणाबाजीमुळं पंकजा मुंडे संतापल्या. कार्यकर्त्यांना म्हणाल्या मूर्ख कुठले..

पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे. या घोषणा याठिकाणी देण्यात आल्या. तर यावेळी घोषणाबाजी वरून, प्रचंड संतप्त झाल्या होत्या, यावेळी कार्यकर्त्यांना चापट मारत
त्यांनी कार्यकर्त्यांना देखील झापलं. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले, अस म्हणत संतापलेल्या पंकजामुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले. भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शना साठी आले असता कार्यकर्त्यानी घोषणा बाजी केली .यावेळी पंकजामुंडेनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याना चांगलंच झापल.. संताप व्यक्त करत तुमच्या बालिश पणाचा मला त्रास होतोय अस देखील त्या म्हणाल्या..

पंकजा मुंडे कडाडल्या,

आणखी वाचा:आष्टी विधानसभा मतदार संघात पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मा.आ.भीमसेन धोंडे यांची मागणी

या जन आशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. दरम्यान यावेळी मुंडे समर्थकांना गोपीनाथ गडावर दाखल होताच तीव्र घोषणाबाजीला सुरुवात केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles